पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 25 SEP 2024 9:08AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.  पंडित दीनदयाल उपाध्याय यांची अंत्योदय ही संकल्पना विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मोदी म्हणाले.

 पंतप्रधानांनी आपल्या X वर पोस्टवर म्हटले आहे;
महान राष्ट्रवादी विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी-कोटी प्रणाम. अंत्योदय ही त्यांच्या विचारांतून विकसित  झालेली योजना भारताने केलेल्या संकल्पांची पूर्तता करण्यात  अमूल्य भूमिका निभावत आहे. देशाप्रती त्यांची असलेली समर्पण भावना आणि सेवा भाव सदैव आपल्या स्मरणात राहील.” 

***

SonalT/SampdaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2058500) Visitor Counter : 31