पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

Posted On: 22 SEP 2024 11:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांची 22 सप्टेंबर 2024 रोजी, न्यूयॉर्कमधील भविष्यासाठीच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली.

पंतप्रधानांनी गाझामध्ये उद्भवलेले मानवी संकट आणि या भागातील ढासळत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आणि पॅलेस्टाईनच्या लोकांना निरंतर मानवतावादी मदतीसाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. पंतप्रधानांनी इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या काळाच्या कसोटीवर खऱ्या ठरलेल्या तत्त्वनिष्ठ भूमिकेचा पुनरुच्चार केला तसेच युद्धविराम, ओलीसांची सुटका करून संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत जाण्याचे आवाहन केले. केवळ दोन राज्यांमधला  तोडगा  या प्रदेशात शाश्वत शांतता आणि स्थैर्य प्रदान करेल यावर त्यांनी भर दिला.  पॅलेस्टाईनला मान्यता देणाऱ्या पहिल्या काही देशांपैकी भारत एक असल्याचे स्मरण करून त्यांनी पॅलेस्टाईनच्या संयुक्त राष्ट्राच्या सदस्यत्वाला भारताचा कायम पाठिंबा असल्याचे सांगितले.

दोन्ही नेत्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनला भारताचा पाठिंबा आणि शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षमता निर्माण करण्याच्या पॅलेस्टाईनच्या प्रयत्नांमध्ये दिली जात असलेली मदत आणि पाठिंबा यासह भारत-पॅलेस्टाईन द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर रचनात्मक चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत-पॅलेस्टाईन द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेलाही दुजोरा दिला.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2057847) Visitor Counter : 11