पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन
प्रविष्टि तिथि:
21 SEP 2024 11:15AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2024
आज मी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी विल्मिंग्टन या त्यांच्या मूळ शहरात आयोजित केलेल्या क्वाड शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या बैठकीत ‘समिट ऑफ द फ्युचर’ ला संबोधित करण्यासाठी मी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना होत आहे. माझे सहकारी राष्ट्राध्यक्ष बिडेन, पंतप्रधान अल्बानीज आणि पंतप्रधान किशिदा यांच्यासोबत क्वाड शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. हिंद- प्रशांत क्षेत्रात शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी कार्य करण्यासाठी समविचारी देशांचा प्रमुख गट म्हणून हा मंच उदयाला आला आहे.
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासोबतची माझी भेट आम्हाला भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी आमच्या जनतेच्या फायद्यासाठी आणि जागतिक कल्याणासाठी अधिक दृढ करण्याच्या नव्या मार्गांचा आढावा घेण्याची आणि ते लक्षात घेण्याची संधी देईल.
मी भारतीय समुदायासोबत आणि जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या लोकशाहींमधील आगळ्या वेगळ्या भागीदारीला चेतना देणाऱ्या आणि प्रमुख हितधारक असलेल्या महत्त्वाच्या अमेरिकन व्यावसायिक नेत्यांसोबत संवाद साधण्यासाठी उत्सुक आहे.
समिट ऑफ द फ्युचर ही जागतिक समुदायासाठी मानवतेच्या कल्याणाची भविष्यातील वाटचाल निर्धारित करण्याची एक संधी आहे. जागतिक लोकसंख्येचा सहावा भाग असलेल्या आपल्या लोकसंख्येचा शांततामय आणि सुरक्षित भविष्यावर सर्वात जास्त अधिकार असल्याने त्यांच्या वतीने मी त्यांचे विचार सामाईक करेन.
* * *
JPS/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2057252)
आगंतुक पटल : 447
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam