माहिती आणि प्रसारण मंत्रालय
'स्वच्छता ही सेवा' अंतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ ही वृक्षारोपण मोहीम पुढे नेण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय सज्ज
Posted On:
18 SEP 2024 4:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2024
‘एक पेड माँ के नाम’ हे अभियान 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. आपल्या पृथ्वीला पर्यावरणदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी आणि निसर्ग मातृदेवतेचे रक्षण करण्यासाठी तसेच शाश्वत जीवनशैलीला आत्मसात करण्याच्या आपल्या वचनबद्धतेने प्रेरित होऊन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून वृक्षारोपण मोहीम सुरू केली आहे. आजपर्यंत मंत्रालयाने देशभरात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी आपल्या विभागीय कार्यालयांसह सुमारे 7000 वृक्षांचे रोपण केले आहे. 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2024 या पंधरवड्यातील 'स्वच्छता ही सेवा' या मोहिमेदरम्यान, आपल्या मातेबद्दलचे प्रेम आणि आदर, मातृभूमीचे रक्षण आणि जतन करण्यासाठी वृक्षारोपण मोहिमेला गती देण्यासाठी अनेक उपक्रम केले जात आहेत.
नवी दिल्ली येथील कार्यालयाच्या आवारातील वृक्षारोपण
ऐझ्वाल दूरदर्शन केंद्राच्या आवारातील वृक्षारोपण
बंगळुरू येथील कार्यालयाच्या आवारातील वृक्षारोपण
तिरुवनंतपुरम येथील दूरदर्शन कार्यालयाच्या आवारातील वृक्षारोपण
भुबनेश्वर येथील दूरदर्शन कार्यालयाच्या आवारातील वृक्षारोपण
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू,, नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी, त्यांच्या आईसह एक झाड लावताना
S.Pophale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2056048)
Visitor Counter : 62