कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
नॅशनल इंस्ट्रक्शनल मीडिया इन्स्टिट्यूटने आयटीआय विद्यार्थ्यांसाठी सुरू केले यू ट्यूब चॅनेल : याद्वारे प्रादेशिक भाषांमध्ये मोफत ऑनलाइन प्रशिक्षण
Posted On:
12 SEP 2024 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2024
व्यावसायिक शिक्षण अधिक सुलभ रीतीने मिळावे, या दृष्टीकोनातून नॅशनल इंस्ट्रक्शनल मीडिया इन्स्टिट्यूट,निमी, या प्रशिक्षण महासंचालनालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या विभागाच्या वतीने आज एका यू ट्यूब वाहिनीचा आरंभ करण्यात आला.हा डिजिटल उपक्रम नऊ भाषांमध्ये उपलब्ध होणार असून असलेल्या भारतातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) कौशल्य परिसंस्थेतील लाखो विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या व्हिडिओ द्वारे हे प्रशिक्षण प्रदान करेल.
इंग्रजी, हिंदी, तमिळ, बंगाली, मराठी, पंजाबी, मल्याळम, तेलुगु आणि कन्नड या भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या नवीन वाहीनीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना सुलभ डिजिटल संसाधनांद्वारे त्यांची तांत्रिक कौशल्ये सुधारण्यास मदत करणे हे असून ते प्रशिक्षण मोफत,उपलब्ध करण्यात येईल.प्रत्येक चॅनेलमध्ये ट्यूटोरियल्स, कौशल्य प्रात्यक्षिके आणि सैद्धांतिक धडे दिलेले आहेत, जे सर्व आजच्या व्यावसायिक प्रशिक्षणाच्या वातावरणाशी सुसंगतत असून उद्योगतज्ञांनी तयार केले आहेत.
चॅनेलची प्रमुख वैशिष्ट्ये:
- नऊ प्रादेशिक भाषांमध्ये मोफत सामग्री उपलब्ध आहे.
- उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रातील उच्च-गुणवत्तेचे शिक्षण साहित्य उपलब्ध.
- शिकणाऱ्यांना आधुनिक उद्योग कौशल्यांची माहिती मिळावी यासाठी अद्ययावत माहितीचे प्रदान.
वाढत्या उद्योगांना समर्थन देणारी प्रशिक्षण सामग्री प्रदान करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करणारा NIMI चा हा उपक्रम भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टांशी अनुरूप आहे.
"आमचा विश्वास आहे, की डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे व्यावसायिक शिक्षण परिवर्तनाची गुरुकिल्ली आहेत,अनेक भाषांमधून सामग्री उपलब्ध करून,शिक्षण देशाच्या प्रत्येक भागात पोहोचेल, हे आम्ही सुनिश्चित करत आहोत तसेच शिक्षण सर्वसमावेशक बनवून आणि शिकणाऱ्यांना आवश्यक असलेली उद्योग-संरेखित कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सक्षम बनवत आहोत."असे निमिच्या अधिकाऱ्यानी यावेळी सांगितले.
आयटीआय मधील विद्यार्थी,त्यांचे प्रशिक्षक आणि कौशल्य विकसित करु इच्छिणाऱ्यांसाठी आधुनिक सामग्रीसह अद्ययावत राहण्यासाठी त्यांच्या पसंतीच्या भाषेतील प्रादेशिक चॅनेलची सदस्यता घेण्यासाठी NIMI विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहे.
अधिक माहितीसाठी, NIMI च्या संकेतस्थळाला भेट द्या किंवा यु ट्यूब वर NIMI Digital चे सदस्यत्व घ्या.
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2054288)
Visitor Counter : 119