पंतप्रधान कार्यालय
जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
भारत-जपान दरम्यानच्या मजबूत संबंधांचा केला पुनरुच्चार
Posted On:
06 SEP 2024 8:51PM by PIB Mumbai
जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्याशी असलेल्या आपल्या घनिष्ट मैत्रीला उजाळा दिला, आणि भारत-जपान संबंधांच्या क्षमतेवरील आबे सान यांचा दृढ विश्वास अधोरेखित केला. आबे यांच्या पत्नीने भारताबरोबर संबंध कायम ठेवल्याबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
"आज दुपारी श्रीमती आबे यांना भेटून आनंद झाला. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्याबरोबरच्या माझ्या घनिष्ठ मैत्रीला उजाळा मिळाला. भारत-जपान संबंधांच्या क्षमतेवरील आबे सान यांचा विश्वास आमच्यासाठी शाश्वत शक्तीचा स्त्रोत राहील. श्रीमती आबे यांनी भारताबरोबर संबंध कायम ठेवल्याबद्दल मनापासून प्रशंसा करतो.”
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2052704)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam