राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा

Posted On: 04 SEP 2024 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2024

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातील शिक्षकांना शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.

संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या,“शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्या देशातील सर्व शिक्षकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.महान अध्यापक, तत्त्वज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान होते त्यांच्या जयंतीदिनी शिक्षक दिन साजरा करतात. याचे औचित्य साधून मी न्रमपणे त्यांना श्रद्धांजली अर्पण करते.

मुले हे राष्ट्राचे भवितव्य आहेत.विद्यार्थी असताना ती जीवन कौशल्ये आणि मूल्ये शिकतात.शिक्षक गुरू म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाला देशाचे भविष्य घडवणारे नेतृत्व म्हणून आकार देतात.

भावी पिढ्यांच्या मनाची जडणघडण करून त्यांना एकंदरच सर्वोत्तम बनवण्याची महत्वपूर्ण कामगिरी शिक्षकांवर सोपवलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, चिकीत्सक विचार कौशल्य आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव रुजवणे शिक्षकांचे कर्तव्य आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये अपेक्षित अध्यापनाच्या आधुनिक पद्धती आणि तंत्रज्ञानाच्या इष्टतम वापराधारे शिक्षक विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आणि विकसित राष्ट्र उभारणीसाठी सक्षम करू शकतात.

मी पुन्हा एकदा संपूर्ण शिक्षक परिवाराला माझ्या उत्तम शुभेच्छा देते आणि भारताला उच्च स्थानी नेणारा ज्ञानी विद्यार्थी समुदाय घडवण्याच्या त्यांच्या कार्यात त्यांना यश येवो अशी इच्छा व्यक्त करते.”

राष्ट्रपतींच्या संदेशासाठी इथे क्लिक करा.

S.Patil/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 2051947) Visitor Counter : 29