उपराष्ट्रपती कार्यालय
आपल्या कन्या आणि महिलांच्या मनात असलेली भीती हा राष्ट्रीय चिंतेचा विषय- उपराष्ट्रपती
सर्व महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
Posted On:
30 AUG 2024 3:23PM by PIB Mumbai
महिलांवरील हिंसाचाराला ‘लक्षणात्मक आजार’ म्हणून संबोधले गेल्याचा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज तीव्र निषेध केला. आज दिल्ली विद्यापीठाच्या भारती महाविद्यालयात ‘विकसित भारतातील महिलांची भूमिका’ या विषयावर विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले, “मी अवाक झालो आहे; सर्वोच्च न्यायालयाचा बार सदस्य, खासदार अशा पद्धतीने वागतो याचे मला दुःख आणि काहीसे आश्चर्य वाटते. किती लज्जास्पद आहे! अशा भूमिकेचा निषेध करण्यात माझे शब्द अपुरे आहेत. हा त्या उच्च पदासमवेत सर्वात मोठा अन्याय आहे.
राष्ट्रपतींच्या “बास आता खूप झाले” या आवाहनाचा पुनरुच्चार करण्याचे आवाहन नागरिकांना करून धनखड म्हणाले, “राष्ट्रपतींनी सांगितले आहे, बास आता खूप झाले!” चला, पुरे झाले म्हणूया. हे आवाहन राष्ट्रीय आवाहन व्हावे अशी माझी इच्छा आहे. प्रत्येकाने या आवाहनात सहभागी व्हावे अशी माझी इच्छा आहे. चला संकल्प करूया, एक व्यवस्था निर्माण करूया, यापुढे, एखाद्या मुली किंवा महिलेवर अत्याचार करणाऱ्याला थारा नसेल, सहिष्णुता नसेल.
आमच्या मुली आणि महिलांच्या मनात असलेली भीती ही चिंताजनक बाब, राष्ट्रीय चिंतेची बाब असल्याचे सांगून धनखड म्हणाले, “ज्या समाजात महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाहीत तो समाज सुसंस्कृत नाही. लोकशाही कलंकित झाली आहे; आमच्या प्रगतीचा आणि आजचा तो सर्वात मोठा अडथळा आहे.”
“मुली आणि महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या गरजेवर भर देताना धनखड म्हणाले, “मी तुम्हा प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचे आवाहन करतो. तुमची उर्मी आणि क्षमता जोखण्याकरिता तुमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
“राष्ट्राच्या विकासात कन्या या सर्वात महत्त्वाच्या हितधारक आहेत. त्या ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषी-अर्थव्यवस्था आणि अनौपचारिक अर्थव्यवस्थेचा कणा आणि भक्कम आधार आहेत” असेही त्यांनी नमूद केले.
स्त्री-पुरुष आधारित असमानता दूर करण्याचा सल्ला देताना उपराष्ट्रपतींनी समाजातील महिलांसाठी वेतन आणि संधींच्या बाबतीत असलेला विद्यमान स्त्री-पुरुष भेदाभेद अधोरेखित केला."
समान नागरी संहितेच्या गरजेकडे लक्ष वेधून उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले की, “समान नागरी संहिता हा संविधानात्मक आदेश आहे. ते निर्देशात्मक तत्त्वांमध्ये समाविष्ट आहे.
संपूर्ण भाषणासाठी: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2050045 येथे क्लिक करा.
***
N.Chitale/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2050169)
Visitor Counter : 51