पंतप्रधान कार्यालय
भारतीय परराष्ट्र सेवेतील 2023 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
29 AUG 2024 8:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2024
भारतीय परराष्ट्र सेवा – आयएफएसमधील वर्ष 2023 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7, लोक कल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 2023 च्या तुकडीत 15 विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 36 आयएफएस अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील परराष्ट्र धोरणाच्या यशाची या अधिकारी प्रशिक्षणार्थींनी प्रशंसा केली आणि आपल्या आगामी कार्यभाराबाबत पंतप्रधानांना सूचना देण्याची आणि मार्गदर्शनाची विनंती केली. भारताची संस्कृती अभिमानाने आणि प्रतिष्ठेने आपल्याबरोबर न्यावी आणि जिथे जिथे नेमणूक होईल तिथे ती जरूर सादर करावी, अशी सूचना पंतप्रधानांनी या प्रशिक्षणार्थींना केली. वैयक्तिक आचरणासह जीवनाच्या सर्वच पैलूंमधून वसाहतवादाची मानसिकता हद्दपार करून देशाचे स्वाभिमानी प्रतिनिधीत्व करावे, असे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले.
जागतिक व्यासपीठावर भारताबाबतच्या बदलत्या भूमिकेविषयी पंतप्रधानांनी चर्चा केली. परस्परांविषयी आदर बाळगून, आपली प्रतिष्ठा राखून आता बरोबरीने जगाशी देवाणघेवाण करत असल्याचे ते म्हणाले. कोविड महासाथीची हाताळणी भारताने इतर देशांच्या तुलनेत कशा प्रकारे केली याविषयी पंतप्रधानांनी सांगितले. देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
परदेशी नियुक्ती झाल्यावर तिथल्या भारतीय समुदायाशी संपर्क वाढवण्याची सूचना पंतप्रधानांनी अधिकारी प्रशिक्षणार्थींना केली.
* * *
N.Chitale/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2049950)
Visitor Counter : 62
Read this release in:
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu