वस्त्रोद्योग मंत्रालय
तांत्रिक वस्त्रोद्योगातील चार स्टार्ट-अप्सना सरकारने दिली मंजुरी
Posted On:
27 AUG 2024 10:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2024
राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानांतर्गत आज, नवी दिल्ली येथील उद्योग भवनामध्ये 8व्या अधिकारप्राप्त कार्यक्रम समितीची (ईपीसी) बैठक झाली. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, समितीने चार स्टार्ट-अप्सना मान्यता दिली आहे. तंत्र वस्त्रोद्योगातील महत्त्वाकांक्षी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नवोदितांसाठी संशोधन आणि उद्योजकतेसाठी अनुदान (ग्रेट)’ योजनेअंतर्गत प्रत्येकी सुमारे 50 लाख रूपये अनुदानासह ही मान्यता देण्यात आली आहे.
तंत्र वस्त्रोद्योगातील शैक्षणिक संस्थांना सक्षम करण्यासाठी सामान्य मार्गदर्शक तत्त्वांअंतर्गत तांत्रिक वस्त्रोद्योगातील अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी समितीने अंदाजे समितीने अंदाजे अनुदानही मंजूर केले आहे. 20 कोटी रूपयांचे अनुदानही मंजूर केले आहे.
मंजूर झालेल्या स्टार्ट-अप प्रकल्पामध्ये ‘कंपोझिट’, ‘सस्टेनेबल टेक्सटाइल’ आणि ‘स्मार्ट टेक्सटाइल’ या प्रमुख धोरणात्मक क्षेत्रांवर केंद्रित केले जाणार आहे. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांनी विविध क्षेत्रात नवीन बी.टेक अभ्यासक्रम आणि जिओटेक्स्टाइल, जिओसिंथेटिक्स, कॉम्पोझिटस, बांधकाम संरचना, इत्यादींसह तांत्रिक वस्त्रोद्योगामध्ये प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2049225)
Visitor Counter : 64