कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्या नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात अनुभव पुरस्कार 2024 चे होणार वितरण


केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीपूर्व समुपदेशन कार्यशाळेचे डॉ जितेंद्र सिंह करणार उद्घाटन

Posted On: 27 AUG 2024 8:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑगस्ट 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने मार्च 2015 मध्ये 'अनुभव' नावाचा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केला. सेवानिवृत्त होत असलेल्या/ सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या सेवेच्या कालावधीत केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीचे दर्शन घडवण्याचे हे एक साधन आहे.

2016 रोजी स्थापना झाल्यापासून निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग 7व्या अनुभव पुरस्कार वितरण सोहळ्याचे 28 ऑगस्ट 2024 रोजी आयोजन करत  आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वीच्या सहा सोहळ्यात 54 अनुभव पुरस्कार आणि 10 परीक्षक प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली आहेत.

यावर्षी 22 मंत्रालये/ विभाग यांनी आपले लिखाण प्रकाशित केले ज्यापैकी उल्लेखनीय लिखाणांना 5 अनुभव पुरस्कार आणि 10 परीक्षक प्रमाणपत्रे राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रदान केली जातील. एकूण 15 पुरस्कार विजेत्यांपैकी 33% विजेते महिला म्हणजेच अनुभवच्या इतिहासातील महिलांची सर्वोच्च संख्या  असल्याने या पुरस्कार सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. यातून त्यांचा शासनामधील वाढलेला सहभाग आणि योगदान दिसून येत आहे. या 15 पुरस्कार विजेत्यांच्या व्यावसायिक कामगिरीचा सन्मान करण्यासाठी आणि ते अधोरेखित करण्यासाठी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग एक लघुपट आणि प्रशस्ती पुस्तिका देखील प्रकाशित करणार आहे.

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग 28 ऑगस्ट 2024 रोजी डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत 55व्या निवृत्तीपूर्व समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करणार आहे. या कार्यशाळेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ आणि निवृत्ती वेतन मंजुरी प्रक्रियेशी संबंधित माहिती दिली जाईल.

या निवृत्तीपूर्व समुपदेशन कार्यशाळेदरम्यान “बँक प्रदर्शन” आयोजित करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये 18 पेन्शन वितरण बँका सहभागी होतील. सर्व सहभागींना निवृत्तीवेतनधारक संबंधित बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. सेवानिवृत्तांना पेन्शन खाते उघडण्याबाबत आणि त्यांना योग्य असलेल्या विविध योजनांमध्ये पेन्शन निधीची गुंतवणूक करण्याबाबत बँका मार्गदर्शन करतील.

केंद्र सरकारच्या सेवानिवृत्तांसाठी अतिशय सुलभ आणि आरामदायी संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी सुशासनाचा भाग म्हणून हा विभाग अशा कार्यशाळा आयोजित करत राहील. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग 28 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्लीत डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 11वी देशव्यापी पेन्शन अदालत आयोजित करेल.

निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे निवारण करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक  कल्याण विभागा द्वारे पेन्शन अदालत आयोजित केल्या जात आहेत ज्यामध्ये अनेक हितधारकांना तात्काळ  निवारणासाठी एका मंचावर आणले जाते. देशभरातील सर्व पेन्शन अदालतींमध्ये 17,760 प्रकरणांचा निपटारा(74 टक्के निवारण दर) करण्यात आला.

11 वी पेन्शन अदालत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या सुपर सिनियर्स पेन्शन प्रकरणांवर भर देईल.

निवृत्तीवेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना सामाईक  एक खिडकी पोर्टल प्रदान करण्यासाठी भविष्य प्लॅटफॉर्मचा आधार म्हणून वापर करत निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने "एकात्मिक पेन्शनर्स पोर्टल" विकसित केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया यांनी आधीच त्यांच्या पेन्शन पोर्टलचे एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलसोबत एकात्मिकरण केले आहे. युनियन बँक ऑफ इंडिया उद्या या समूहामध्ये सामील होणार आहे. 

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2049210) Visitor Counter : 10