मंत्रिमंडळ
azadi ka amrit mahotsav

युनिफाइड निवृत्तीवेतन योजनेला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

Posted On: 24 AUG 2024 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 ऑगस्ट 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज युनिफाइड निवृत्तीवेतन योजनेला (UPS) मंजुरी दिली.

युनिफाइड निवृत्तीवेतन योजनेची ठळक वैशिष्ट्ये :

  1. आश्र्वासित निवृत्तीवेतन : 25 वर्षांच्या किमान पात्रता सेवेसाठी सेवानिवृत्त होण्यापूर्वीच्या 12 महिन्यांत काढलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50%. हे वेतन किमान 10 वर्ष इतक्या कमी सेवा कालावधीसाठी प्रमाणानुसार असेल.
  2. आश्र्वासित कौटुंबिक निवृत्तीवेतन: कर्मचाऱ्याच्या निधनापूर्वीच्या निवृत्तीवेतनाचे 60%.
  3. आश्र्वासित किमान निवृत्तीवेतन : किमान 10 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यावर रुपये 10,000 दरमहा.
  4. महागाई निर्देशांक: आश्र्वासित निवृत्तीवेतनावर, आश्र्वासित कौटुंबिक निवृत्तीवेतनावर आणि आश्र्वासित किमान निवृत्तीवेतनावर सेवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत औद्योगिक कामगारांसाठी (AICPI-IW) अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई सवलत
  5. ग्रॅच्युइटी व्यतिरिक्त सेवानिवृत्तीवर एकरकमी देयक. प्रत्येक पूर्ण केलेल्या सहा महिन्यांच्या सेवेसाठी सेवानिवृत्तीच्या तारखेनुसार मासिक वेतनाच्या 1/10 भाग (वेतन + महागाई भत्ता) हे आश्वासित निवृत्तीवेतनाचे प्रमाण कमी करणार नाही.

 

* * *

S.Nilkanth/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2048640) Visitor Counter : 1048