पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
23 AUG 2024 8:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची आज कीव येथे भेट घेतली.मेरीनस्की राजप्रासादामध्ये आगमन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी स्वागत केले.
उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंवर चर्चा केली आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली.या बैठकीनंतर, एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले.
या निवेदनाचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
यावेळी दोन्ही नेत्यांनी चार करारांवर स्वाक्षरी केल्या. यामध्ये -
(i) कृषी आणि अन्न उद्योग क्षेत्रामध्ये सहकार्य संबंधित करार
(ii) वैद्यकीय उत्पादने नियमन क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार;
(iii) उच्च प्रभाव असलेल्या समुदाय विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय मानवतावादी अनुदान सहाय्याविषयी सामंजस्य करार; आणि
(iv) 2024-2028 साठी सांस्कृतिक सहकार्याचा कार्यक्रम करण्याविषयी करार यांचा समावेश आहे.
N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2048344)
आगंतुक पटल : 66
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam