गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांना लाभांश म्हणून 19.08 कोटी रूपयांचा धनादेश रेपको बँकेने केला सादर
केंद्रसरकारच्या 76.32 कोटी रूपये मूल्याच्या भाग भांडवलावर 25% दराने दिलेला लाभांशाचा धनादेश नवी दिल्लीत सादर
केंद्र सरकारची संस्था असलेल्या रेपको बँकेवर प्रशासकीय नियंत्रण गृह मंत्रालयाचे आहे; बँकेने मिश्र पद्धतीने व्यवसाय करून ओलांडला 20,000 कोटीं रूपयांचा टप्पा
Posted On:
23 AUG 2024 10:19AM by PIB Mumbai
रेपको बँकेने आज लाभांशापोटी 19.08 कोटी रूपयांचा धनादेश सरकारला सादर केला. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांना हा धनादेश सादर केला.
2023-24 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारच्या 76.32 कोटी मूल्याच्या भागभांडवलावर 25% दराने लाभांशाचा धनादेश रेपको बँकेचे अध्यक्ष ई. संथानम आणि व्यवस्थापकीय संचालक ओ.एम. गोकुळ यांच्या हस्ते गृहमंत्री शहा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला आणि मंत्रालयाचे विशेष अधिकारी (ओएसडी) गोविंद मोहन हेही उपस्थित होते.
रेपको बँक ही केंद्र सरकार संचलित संस्था असून, या बँकेवर प्रशासकीय नियंत्रण गृह मंत्रालयाचे आहे. बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मिश्र व्यवसायामध्ये 11% वाढ नोंदवली. उल्लेखनीय कामगिरी म्हणजे, आज बँकेने मिश्र व्यवसायामध्ये 20,000 कोटी रूपयांचा टप्पा ओलांडला आहे.
***
JPS/SB/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2048019)
Visitor Counter : 63
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada