पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात पोलिश इंडोलॉजिस्टची घेतली भेट
Posted On:
22 AUG 2024 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रख्यात पोलिश इंडोलॉजिस्टच्या समूहाची भेट घेतली. या समूहात पुढील व्यक्तींचा समावेश होता:
प्रतिष्ठित पोलिश संस्कृत विद्वान आणि वॉर्सा विद्यापीठाचे प्रोफेसर एमेरिटस प्राध्यापक मारिया क्रिस्टोफर बायर्स्की- प्राध्यापक बायर्स्की यांनी 1993 ते 1996 याकाळात पोलंडचे भारतातील राजदूत म्हणून काम केले आहे. मार्च 2022 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार प्रदान केला आहे.
प्रख्यात पोलिश हिंदी विद्वान आणि पॉझ्नान येथील ॲडम मिकीविक विद्यापीठात (AMU), आशियाई अभ्यास विभागाच्या प्रमुख प्राध्यापक मोनिका ब्रोवार्क्झिक- प्राध्यापक ब्रोवार्क्झिक यांना फेब्रुवारी 2023 मध्ये फिजी येथील 12 व्या विश्व हिंदी संमेलनात विश्व हिंदी सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
भारतीय तत्त्वज्ञानातील प्रमुख पोलिश विद्वान आणि क्राको येथील जेगीलोनियन विद्यापीठातील ओरिएंटल स्टडीज संस्थेच्या प्रमुख प्राध्यापक हॅलिना मार्लेविच.
प्रख्यात पोलिश इंडोलॉजिस्ट आणि वॉर्सा विद्यापीठातील दक्षिण आशिया अभ्यास विभागाचे माजी प्रमुख प्राध्यापक डनुटा स्टॅसिक.
प्रख्यात पोलिश इंडोलॉजिस्ट आणि व्रोकला विद्यापीठातील भारतीय अभ्यास प्रमुख प्राध्यापक प्रझेमिस्लॉ स्झुरेक.
भारतीय विषयातील या विद्वानांच्या गहन रुचीचे पंतप्रधानांनी कौतुक केले. भारत-पोलंड सांस्कृतिक संबंध दृढ करण्यात आणि परस्पर समंजसपणाला चालना देण्यासाठी त्यांचे कार्य आणि शैक्षणिक संशोधन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. 19 व्या शतकाच्या आधीपासून पोलंडमधील लोकांना इंडोलॉजीमध्ये रस होता.
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2047869)
Visitor Counter : 43
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam