पंतप्रधान कार्यालय
पोलंडमधील वॉर्सा येथे अज्ञात सैनिकाच्या समाधीस्थळी पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
22 AUG 2024 8:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलंडमधील वॉर्सा येथे अज्ञात सैनिकाच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली.
अज्ञात सैनिकांचे समाधीस्थळ हे देशाच्या सेवेत प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिश सैनिकांच्या स्मृतीला समर्पित एक आदरणीय स्मारक आहे. पिलसुडस्की स्क्वेअर येथे स्थित हे समाधीस्थळ पोलंडमधील राष्ट्रीय स्मृती आणि सन्मानाचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे.
पंतप्रधानांनी या समाधीस्थळावर अर्पण केलेली आदरांजली, भारत आणि पोलंड यांच्यातील दृढ आदर आणि ऐक्याची भावना अधोरेखित करते.
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2047834)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam