गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पद्म पुरस्कार -2025साठी नामांकने सादर करण्यासाठीची मुदत 15 सप्टेंबर 2024 पर्यंत

Posted On: 22 AUG 2024 5:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑगस्ट 2024

 

प्रजासत्ताक दिन 2025 ला घोषित करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी नामनिर्देशन किंवा शिफारशीं पाठवण्यासाठीची प्रक्रिया‌ 1 मे 2024 पासून सुरू झाली आहे. पद्म पुरस्कारासाठी नामनिर्देशनाची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे. पद्म पुरस्कारासाठी नामनिर्देशने किंवा शिफारसी (https://awards.gov.in) या ऑनलाइन, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर स्वीकारल्या जातील. 

पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या नावाने ओळखले जाणारे पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. वर्ष 1954 मध्ये सुरुवात झालेले हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला घोषित  होतात. महान कार्य किंवा कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, आरोग्य-उपचार, सामाजिक कार्य, विज्ञान तसेच अभियांत्रिकी, सार्वजनिक सेवा, नागरी सेवा, व्यापार, औद्योगिकी अशा क्षेत्रात किंवा विषयात उल्लेखनीय यश किंवा अपवादात्मक सेवा यांना दाद देण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. असे यश मिळवणारी व्यक्ती ही  तिचा वंश,व्यवसाय , स्तर ,लिंग यांचा कोणताही अपवाद न करता या पुरस्काराला पात्र असते. वैद्यक व्यावसायिक आणि शास्त्रज्ञ यांचा अपवाद वगळता सरकारी तसेच सार्वजनिक सेवा क्षेत्रातील कंपन्यातील कर्मचाऱ्यांचा विचार पद्म पुरस्कारासाठी केला जात नाही.

पद्म पुरस्कारामध्ये जनमानसाच्या पद्म पुरस्काराचे प्रतिबिंब असावे यासाठी सरकार वचनबद्ध आहे. म्हणून  सर्व नागरिकांना, स्वतःचे नामनिर्देशन किंवा इतरांच्या शिफारसी करण्याची विनंती सरकारकडून करण्यात आली आहे.

स्त्रिया, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि जे समाजासाठी निस्वार्थ सेवा देतात अशांमधील अशा बुद्धिमान व्यक्ती ज्यांचे वैशिष्ट्य आणि यश खरोखरच दखलपात्र आहे अशा व्यक्ती शोधून काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जातील.

नामनिर्देशन किंवा शिफारसी देताना वरील पोर्टलमध्ये दिलेल्या नमुन्यामध्ये सर्व संबंधित तपशील द्यावा. या तपशिलात जास्तीत जास्त 800 शब्दांपर्यंत निवेदनात्मक पद्धतीने दिलेले उद्धरण असणे अपेक्षित आहे ज्यामध्ये त्या व्यक्तीने स्वतःच्या संबंधित विषयात किंवा विषय शाखेत साध्य केलेले उल्लेखनीय यश किंवा अपवादात्मक सेवा यावर भर देणारी माहिती असेल.

यासंबंधीचे अधिक माहिती (https://mha.gov.in)  या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावर,  ‘पुरस्कार आणि पदके’ या शीर्षकाखाली तसेच पद्म पुरस्काराच्या (https://padmaawards.gov.in ) या पोर्टलवर मिळेल. या पुरस्काराशी संबंधित नियम तसेच पुरस्कारांची प्रतिष्ठा याबद्दलची माहिती पद्म पुरस्काराच्या संकेतस्थळावर https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या  लिंक वर मिळेल.

 

* * *

S.Tupe/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2047739) Visitor Counter : 71