पंतप्रधान कार्यालय
आंध्र प्रदेशात अनाकापल्ली येथील दुर्घटनेत झालेल्या मनुष्यहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधीतून अर्थसहाय्याची घोषणा
प्रविष्टि तिथि:
22 AUG 2024 6:56AM by PIB Mumbai
आंध्र प्रदेशात अनाकापल्ली येथील कारखान्यातील दुर्घटनेत झालेल्या जिवीत हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी कामना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधीतून निधन झालेल्यांच्या जवळच्या वारसाला दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये अनुदानाची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स या समाजमाध्यमावर पुढील संदेश आहे,
“अनाकापल्ली येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःख झाले आहे. या दुर्घटनेत आपली प्रिय व्यक्ती गमावलेल्यांप्रति सहवेदना. जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, ही कामना. मृत्यू पावलेल्यांच्या जवळच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधीतून दोन लाख रुपये तर जखमींना रुपये 50 हजार सहाय्य म्हणून देण्यात येतील. : PM @narendramodi”
***
SonalT/ViajayaG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2047528)
आगंतुक पटल : 90
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam