संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाचा बीईएमएल कंपनीशी सामंजस्य करार
सागरी उपकरणे आणि यंत्रणा यांच्या स्वदेशीकरणाला चालना देण्यासाठी भारतीय नौदल आणि बीईएमएल यांचे एकत्रित प्रयत्न
Posted On:
21 AUG 2024 11:57AM by PIB Mumbai
भारतीय नौदलाकडून वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सागरी अभियांत्रिकी उपकरणांचे स्वदेशीकरण करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलत बीईएमएल या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘वर्ग अ’ श्रेणीतील आणि भारताच्या आघाडीच्या संरक्षण आणि अवजड अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्पादन कंपनीने 20 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय नौदलाशी सामंजस्य करार केला आहे.
नवी दिल्ली येथील नौदलाच्या मुख्यालयात भारतीय नौदलाचे एसीओएम (डी आणि आर) रियर अॅडमिरल के श्रीनिवास आणि बीईएमएलचे संरक्षण विभाग संचालक अजित कुमार श्रीवास्तव यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा उपक्रम म्हणजे महत्त्वपूर्ण सागरी अभियांत्रिकी उपकरणे तसेच यंत्रणा यांची स्वदेशी रचना, विकास, निर्मिती, चाचणी आणि उत्पादनविषयक पाठबळासाठी द्विपक्षीय सहकार्यात वाढ करण्याच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाला अनुसरत, संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाच्या बाबतीत स्वावलंबन बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे तसेच परदेशी ओईएमएस (अस्सल उपकरणे निर्माते)वरील अवलंबित्व कमी करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे.
***
JPS/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2047239)
Visitor Counter : 79