पंतप्रधान कार्यालय
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार प्रा. मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
लोकशाही, स्थैर्य नांदणाऱ्या शांततामय, पुरोगामी बांगलादेशसाठी भारताचे पाठबळ असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुनरुच्चार
बांगलादेशातील अंतरिम सरकारकडून तिथल्या हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक समुदायांना सुरक्षा आणि संरक्षणाची खात्री मिळणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्यांकांना संरक्षण आणि सुरक्षेचे प्रा.युनूस यांचे आश्वासन
प्रविष्टि तिथि:
16 AUG 2024 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार प्रा.मोहम्मद युनूस यांच्यात आज दूरध्वनीद्वारे संवाद झाला.
आपल्या संभाषणा दरम्यान,लोकशाही, स्थैर्यशील, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशासाठी भारताचे पाठबळ असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.विविध विकास उपक्रमांद्वारे बांगलादेशातील लोकांना पाठबळ देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला. बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित करण्याचे महत्त्वही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
यावर उत्तर देताना प्रा. युनूस यांनी,अंतरिम सरकार बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याक गटांचे संरक्षण आणि सुरक्षेला प्राधान्य देईल,असे आश्वासन दिले.
दोन्ही नेत्यांनी आपापल्या राष्ट्रीय प्राधान्यांनुसार द्विपक्षीय संबंध पुढे नेण्याच्या मार्गांवरही चर्चा केली.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2046024)
आगंतुक पटल : 73
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam