पंतप्रधान कार्यालय
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गेलेला प्रत्येक खेळाडू ‘चॅम्पियन’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तुकडीशी पंतप्रधानांनी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2024 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय चमूबरोबर संवाद साधला. नवी दिल्लीत त्यांची भेट घेत असताना मोदी यांनी खेळाडूंकडून खेळातील अनुभव ऐकले आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पॅरिसला गेलेला प्रत्येक खेळाडू हा ‘चॅम्पियन’ आहे. भारत सरकार खेळांना पाठबळ देत राहील आणि उच्च दर्जाची क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील, याचीही खात्री देण्यात येईल.
समाज माध्यम ‘एक्स’ वर प्रसिदध केलेल्या संदेश मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
“पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय दलाशी संवाद साधताना आनंद झाला. त्यांचे खेळातील अनुभव ऐकले आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.”
“पॅरिसला गेलेला प्रत्येक खेळाडू हा ‘चॅम्पियन’ आहे. भारत सरकार खेळांना समर्थन देत राहील आणि उच्च दर्जाची क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण होईल हे सुनिश्चित करेल.”
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
(रिलीज़ आईडी: 2045742)
आगंतुक पटल : 96
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam