आदिवासी विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनी आदिवासी स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांना वाहिली आदरांजली

Posted On: 15 AUG 2024 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्ट 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत 78  व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील वीरांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधानांनी स्वातंत्र्य चळवळीच्या खडतर प्रवासाविषयी चिंतन केले, यावेळी  ते म्हणाले, “स्वातंत्र्य चळवळीचा काळ हा संघर्षाचा होता. तरुण, शेतकरी, महिला आणि आदिवासी, प्रत्येकजण गुलामगिरीविरुद्ध सतत लढा देत होता. आपल्या भाषणातून  पंतप्रधानांनी  भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या विविध गटांनी केलेल्या वेगवेगळ्या आणि एकत्रित प्रयत्नांना त्यांनी अधोरेखित केले.’’

आदिवासी स्‍वातंत्र्यसेनानी  भगवान बिरसा मुंडा यांना विशेष आदरांजली वाहताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "देश त्यांच्या निःस्वार्थ बलिदानासाठी आणि देशसेवेसाठी त्यांचा सदैव ऋणी आहे." वयाच्या 22 व्या वर्षी ब्रिटीश राजवटीचा पाया हादरवून टाकणा-या  बिरसा मुंडा यांच्या कामगिरीचा गौरव करताना, त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात मुंडा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला.  

 

 

* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2045673) Visitor Counter : 40