माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीमध्ये फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन


वैयक्तिक कथा, फाळणीतील वेदना आणि 1947 च्या फाळणीचा अगणित लोकांच्या जीवनावर झालेला चिरस्थायी परिणामांना अधोरेखित करणारे प्रदर्शन

Posted On: 14 AUG 2024 10:14PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024

नवी दिल्ली येथील ललित कला अकादमी (एलकेए) येथे आज "फाळणी वेदना स्मृती दिन" निमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत कार्यरत केंद्रीय संचार ब्युरो यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन 14 ऑगस्ट 2024 ते 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत नवी दिल्ली मधील कोपर्निकस मार्ग येथील ललित कला अकादमी (ग्राउंड फ्लोअर गॅलरी) येथे आयोजित केले गेले आहे.

या उद्घाटन सोहळ्याला इतर अभ्यागतांसह शालेय विद्यार्थीसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे प्रदर्शन वैयक्तिक कथा, फाळणीतील वेदना आणि 1947 च्या फाळणीचा अगणित लोकांच्या जीवनावर झालेला चिरस्थायी परिणामांना अधोरेखित करते. या प्रदर्शनाचा उद्देश फाळणीतील त्या वेदनांना सन्मानित करणे आणि या ऐतिहासिक घटनांच्या गुंतागुंतीचे व मानवी मूल्यांचे सखोल आकलन करणे हा आहे. यामध्ये ऐतिहासिक छायाचित्रे, व्हिडिओ आणि इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले दर्शविण्यात आले आहेत, जे या विषयाबद्दल सखोल ज्ञान देतात.

हे प्रदर्शन केवळ भूतकाळाचे प्रतिबिंबच नाही तर भावी पिढ्यांसाठी, विशेषत: विद्यार्थी आणि तरुणांना, सहानुभूती, सलोखा आणि एकतेच्या आधारे आपण भविष्य कसे घडवू शकतो याविषयी अर्थपूर्ण संवाद साधण्याची संधी देखील प्रदान करणारे आहे. हे प्रदर्शन शालेय अभ्यासक्रम आणि मूल्यांसह संरेखित एक मौल्यवान शैक्षणिक अनुभव देखील प्रदान करते. उद्घाटनादरम्यान, केंद्रीय संचार ब्युरोच्या कलाकारांनी विविध देशभक्तिपर गीते सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.


Jaydevi PS/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2045482) Visitor Counter : 35