पंतप्रधान कार्यालय
आपल्या देशातील ऐक्य आणि बंधुत्वाच्या बंधनांचे सदैव रक्षण करण्याप्रती असलेल्या आमच्या कटिबद्धतेला आम्ही दुजोरा देत आहोत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2024 4:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024
देशाच्या फाळणीच्या काळात प्रभावित झालेल्या व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त, एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान मोदी यांनी फाळणीमुळे असंख्य लोकांवर झालेले भयंकर परिणाम आणि सहन कराव्या लागलेल्या वेदना यांचे स्मरण केले आहे.
मानवी लवचिकतेला सलाम करत, पंतप्रधानांनी देशातील ऐक्य आणि बंधुत्वाच्या बंधनांचे सदैव रक्षण करण्याप्रती असलेल्या त्यांच्या कटिबद्धतेला दुजोरा दिला.
एक्स मंचावर पंतप्रधान मोदी लिहितात:
#PartitionHorrorsRemembranceDay च्या प्रसंगी आम्ही आज फाळणीच्या भयंकर घटनेमुळे प्रभावित झालेल्या तसेच प्रचंड प्रमाणात वेदना सहन कराव्या लागलेल्या असंख्य लोकांचे स्मरण करत आहोत.मानवी लवचिकतेच्या ताकदीचे दर्शन घडवणाऱ्या त्या लोकांच्या धैर्याला आदरांजली वाहण्याचा देखील हा दिवस आहे.फाळणीचा परिणाम भोगावा लागलेल्या अनेकांनी त्यांच्या आयुष्याची पुन्हा उभारणी केली आणि प्रचंड यश देखील मिळवले.आपल्या देशातील ऐक्य आणि बंधुत्वाच्या बंधनांचे सदैव रक्षण करण्याप्रती असलेल्या आमच्या कटिबद्धतेला देखील आम्ही दुजोरा देत आहोत.
Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2045254)
आगंतुक पटल : 124
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam