दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

स्पॅम कॉल करणारे बिगर नोंदणीकृत प्रेषक किंवा टेलीमार्केटर्सच्या सर्व दूरसंचार स्रोतांची जोडणी खंडित करण्याचे दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे सेवा पुरवठादारांना आदेश

Posted On: 13 AUG 2024 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 ऑगस्ट 2024

 

स्पॅम कॉल्सच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत दूरसंचार नियामक प्राधिकरणाने सर्व सेवा पुरवठादारांना सर्व व्हॉईस प्रमोशनल कॉल्स थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मग हे कॉल्स आधीपासून मुद्रित केलेले असोत वा कंप्युटर जनरेटेड असोत किंवा एसआयपी/पीआरआयचा वापर करून बिगर नोंदणीकृत प्रेषक किंवा टेलिमार्केटियर्सचे किंवा टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन 2018(TCCCPR-2018) अंतर्गत इतर दूरसंचार रिसोर्सचे असोत.

ऍक्सेस सेवा पुरवठादारांना दिलेले निर्देश खालीलप्रमाणे आहेतः

  1. बिगर नोंदणीकृत प्रेषक/बिगर नोंदणीकृत टेलिमार्केटियर्स (UTMs) यांच्याकडून टेलिकॉम रिसोर्सेसचा(एसआयपी/पीआरआय/ इतर टेलिकॉम रिसोर्सेस) वापर करून येणारे प्रमोशनल कॉल्स तातडीने बंद करावेत.
  2. जर कोणताही प्रेषक/ बिगर नोंदणीकृत टेलिमार्केटियर टेलिकॉम रिसोर्सेसचा(एसआयपी/पीआरआय/ इतर टेलिकॉम रिसोर्सेस) व्यावसायिक व्हॉईस कॉल्स करण्यासाठी गैरवापर करत असल्याचे आढळले ज्यामुळे नियमांचा भंग होऊन कोणत्याही एका किंवा अधिक रिसोर्स इंडिकेटर्सच्या विरोधात ग्राहकांच्या तक्रारी दाखल होतील, तर
    1. अशा प्रेषकाचे सर्व टेलिकॉम रिसोर्सेस नियामकामधील 25 क्रमांकाच्या नियमाने ओरिजिनेटिंग ऍक्सेस प्रोव्हायडरकडून(ओएपी) दोन वर्षांच्या कालावधीसाठी खंडीत करण्यात यावेत.
    2. अशा प्रेषकाला ओएपीकडून नियामकामधील तरतुदीनुसार दोन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात येईल.
    3. प्रेषकाला काळ्या यादीत टाकण्यासंबंधीची माहिती ओएपी द्वारे डीएलटी प्लॅटफॉर्मवरील इतर सर्व ऍक्सेस प्रोव्हायडर्सबरोबर 24 तासांच्या आत सामायिक केली जाईल, जे त्याच्या प्रतिसादादाखल त्या प्रेषकाला दिलेले सर्व टेलिकॉम रिसोर्सेस 24 तासांच्या आत खंडीत करतील.
    4. अशा प्रेषकाला कोणत्याही ऍक्सेस प्रोव्हायडरकडून काळ्या यादीत टाकण्याच्या कालावधीदरम्यान नियामक तरतुदीनुसार कोणताही नवा टेलिकॉम रिसोर्स देण्यात येणार नाही.
  3. नागरिकांना व्यावसायिक व्हॉईस कॉल करण्यासाठी SIP/PRI/इतर दूरसंचार संसाधनांचा वापर करणारे सर्व नोंदणी न केलेले प्रेषक/ बिगर नोंदणीकृत टेलीमार्केटियर्स (UTM) हे निर्देश जारी केल्यापासून एक महिन्याच्या आत डीएलटी प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित केले जातील आणि त्यानंतर सात दिवसांच्या आत अनुपालन अहवाल सादर करतील.

सर्व ऍक्सेस प्रोव्हायडर्सना या निर्देशांचे अनुपालन करण्याचे आणि त्यांनी दर महिन्याच्या पहिल्या आणि 16 तारखेला केलेल्या कार्यवाहीची  ताजी माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.  दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या या निर्णायक पावलामुळे स्पॅम कॉल्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होण्याची आणि ग्राहकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2044962) Visitor Counter : 49