पंतप्रधान कार्यालय
देशातील शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली ग्वाही
Posted On:
11 AUG 2024 4:50PM by PIB Mumbai
देशातील शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. नवी दिल्लीत आज पिकांच्या 109 नवीन वाणांचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पिकांच्या, हवामानाला अनुरुप आणि जास्त उत्पादन देणाऱ्या या वाणांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.
शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांचे अनुभवही ऐकले आणि नैसर्गिक शेतीच्या लाभांबाबत सविस्तर चर्चा केली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील आपल्या टिप्पणीत म्हटले आहे:
“आम्ही आपल्या शेतकरी बंधू-भगिनींना सबळ बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. याच अनुषंगाने, आज दिल्लीत पिकांच्या 109 नवीन वाणांचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. या हवामानानुरुप आणि भरघोस पीक देणाऱ्या वाणांच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल.”
“मला समाधान आहे की आमचे शेतकरी बंधू- भगिनीही नैसर्गिक शेतीकडे वेगाने वाटचाल करत आहेत. आज त्यांचे अनुभव जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. यावेळी आम्ही नैसर्गिक शेतीच्या फायद्यांवरही सविस्तर चर्चा केली."
***
S.Patil/A.Save/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2044311)
Visitor Counter : 69
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam