पंतप्रधान कार्यालय
देशात झालेल्या विक्रमी वायू निर्मितीबद्दल पंतप्रधानांनी केले नागरिकांचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2024 9:27PM by PIB Mumbai
वायू उत्पादन क्षेत्रात देशाने आत्मनिर्भरतेच्या (स्वावलंबनाच्या) दिशेने नवीन विक्रम केल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचे अभिनंदन केले आहे. विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता अत्यंत महत्त्वाची असल्याचे मोदी म्हणाले.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, हरदीप सिंग पुरी यांनी X समाजमाध्यमावरील एका टिप्पणी मध्ये माहिती दिली की देशाने वायू उत्पादनाच्या क्षेत्रात एक नवीन विक्रम साध्य केला आहे. 2020-21 मध्ये वायू उत्पादन 28.7 बी सी एम(अब्ज घनमीटर-बिलियन क्युबिक मीटर) होते. 2023-24 मध्ये ते 36.43 बीसीएम इतके वाढले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2026 मध्ये वायू उत्पादन 45.3 बीसीएम असेल असा अंदाज आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या X वरील टिप्पणी वर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले:
“या कामगिरीबद्दल देशवासियांचे खूप खूप अभिनंदन!
विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रात आपले स्वावलंबन अत्यंत महत्त्वाचे आहे. वायू निर्मितीचा हा विक्रम म्हणजे, या स्वावलंबनाच्या दिशेने आपल्या वचनबद्धतेचा थेट पुरावा आहे.”
***
S.Kane/A.Save/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2041384)
आगंतुक पटल : 100
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam