पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिंग चिंग यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन (1ऑगस्ट 2024)

Posted On: 01 AUG 2024 2:14PM by PIB Mumbai

महामहीमपंतप्रधान फाम मिंग चिंग,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

प्रसार माध्यमांतील आमचा मित्रवर्ग,

नमस्कार!  

सिन चाउ!

पंतप्रधान फाम मिंग चिंग आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे मी भारतात हार्दिक स्वागत करतो.

सर्व प्रथम, सर्व भारतीयांच्या वतीने मी, महासचिव न्युयेन फु चोंग यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करतो.

ते भारताचे जवळचे मित्र होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या संबंधाना धोरणात्मक दिशाही मिळाली होती.

मित्रहो, 

गेल्या एका दशकात, आपला संबंध आयाम विस्तारलाही आहे आणि हे संबंध अधिक घनिष्टही झाले आहेत.

गेल्या 10 वर्षात आम्ही आपल्या संबंधाना समावेशक धोरणात्मक भागीदारीचे स्वरूप दिले आहे.  

आपल्या द्विपक्षीय व्यापारात 85 टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे.

उर्जा, तंत्रज्ञान आणि विकासात्मक भागीदारीत परस्पर सहयोग वृद्धिंगत झाला आहे.

संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात परस्पर सहयोगाला नवा वेग प्राप्त झाला आहे.

गेल्या दशकात, कनेक्टीव्हिटी वाढली आहे आणि आज दोन्ही देशांदरम्यान 50 पेक्षा जास्त थेट विमान उड्डाणे आहेत.  

याबरोबरच पर्यटन क्षेत्रातही सातत्याने वाढ होत आहे आणि लोकांना ई-व्हिसा सुविधाही देण्यात आली आहे.

‘मी सोन’ मध्ये प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.

मित्रहो,

गेल्या दशकातली कामगिरी लक्षात घेऊन आजच्या आमच्या चर्चेत परस्पर सहकार्याच्या सर्व स्तरांवर आम्ही व्यापक चर्चा केली आणि भविष्यासाठी रूपरेषा तयार करण्याच्या दिशेने अनेक पावले उचलली.  

‘विकसित भारत 2047’ आणि व्हिएतनामच्या ‘व्हिजन 2045’ मुळे दोन्ही देशांच्या विकासाने वेग घेतल्याचे आम्ही मानतो.

यातूनच परस्पर सहकार्याची अनेक नवी क्षेत्रे खुली होत आहेत; आणि म्हणूनच आपली समावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम करण्यासाठी आज आम्ही नवा कृती आराखडा स्वीकारला आहे.

संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात सहयोगासाठी नवी पावले उचलली आहेत.  

‘नया चांग’ इथे तयार करण्यात आलेल्या लष्करी सॉफ्टवेअर पार्कचे आज उद्घाटन करण्यात आले.

300 दशलक्ष डॉलर्स पत मर्यादेवर झालेल्या सहमतीमुळे व्हिएतनामची सागरी सुरक्षा बळकट होईल.

दहशतवाद आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातल्या सहकार्यावर अधिक भर आम्ही निश्चित केला आहे.

उभय देशातल्या व्यापार क्षमता उपयोगात आणण्यासाठी आसियान-भारत माल व्यापार कराराचा आढावा लवकरात लवकर पूर्ण करण्यावरही दोन्ही बाजू सहमत आहेत.

डिजिटल पेमेंट कनेक्टीविटीसाठी आपल्या सेन्ट्रल बँकांमध्ये सहमती झाली आहे.

हरित अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाच्या नव्या उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

उर्जा आणि बंदर विकास क्षेत्रात उभय देशांच्या क्षमता परस्पर लाभासाठी उपयोगात आणल्या जातील.

दोन्ही देशातली खाजगी क्षेत्रे, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्ट अप्स आपसात जोडण्याचा दिशेनेही काम केले जाईल.

मित्रहो,

कृषी आणि मत्स्यपालन हे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेचे महत्वाचे भाग आहेत.

ही क्षेत्रे लोकांची उपजीविका आणि अन्न सुरक्षेशी जोडली गेली आहेत.

या क्षेत्रांमध्ये 'जर्मप्लास्म' देवाणघेवाण आणि संयुक्त संशोधनाला प्रोत्साहन दिले जाईल.

आपल्या सामायिक सांस्कृतिक वारसा जतनासाठी जागतिक वारसा स्थळ ‘मी सोन’च्या ‘ब्लॉक एफ’ मंदिरांच्या जतनासाठी भारत सहकार्य देईल.

बौद्धधर्म हा आपला सामायिक वारसा असून यामुळे दोन्ही देश परस्परांशी आध्यात्मिक स्तरावरही जोडले गेले आहेत, हे आपण सर्वजण जाणताच.

भारताच्या बौद्ध मंडलात व्हिएतनामच्या जनतेला आम्ही आमंत्रित करत आहोत.

नालंदा विद्यापीठाचा, व्हिएतनामच्या युवकांनीही लाभ घ्यावा, अशी आमची इच्छा आहे.

मित्रहो,

आमचे 'अ‍ॅक्ट ईस्ट' धोरण आणि आमच्या हिंद-प्रशांत दृष्टीकोनात व्हिएतनाम हा आमचा महत्वाचा भागीदार आहे.

हिंद-प्रशांत विषयी दोन्ही देशांच्या विचारात उत्तम समन्वय आहे.

आम्ही विस्तारवाद नव्हे तर, विकासाचे पुरस्कर्ते आहोत. आम्ही मुक्त, खुल्या नियमाधारित आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी आमचा सहयोग जारी राखू.  

'सीडीआरआय' या आपत्ती रोधक पायाभूत सुविधा आघाडीत सहभागी होण्याच्या व्हिएतनामच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

मित्रहो,

पंतप्रधान फाम मिंग चिंग यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो.

आपल्या दौऱ्याने उभय देशातल्या संबंधांमध्ये नवा आणि सोनेरी अध्याय समाविष्ट होत आहे.

खूप खूप धन्यवाद  !

***

ShilpaP/NilimaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2040594) Visitor Counter : 75