युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांनी 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक स्पर्धा प्रकारात कांस्यपदक जिंकले
पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारताच्या खात्यात दुसरे पदक जमा
Posted On:
30 JUL 2024 7:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जुलै 2024
भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी आपल्या अद्वितीय कामगिरीचे प्रदर्शन करत कांस्य पदकाची कमाई केली आणि पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारताच्या खात्यात दुसरे पदक जमा झाले. मिश्र 10 मीटर एअर पिस्टल सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत या जोडीने कोरिया प्रजासत्ताकच्या प्रतिस्पर्ध्यांवर 13 शॉट्सनंतर 16-10 गुणांसह विजय मिळवला.

अंतिम फेरीतील त्यांच्या असामान्य कामगिरीमुळे त्यांच्या नावावर आणखी एका गौरवास्पद विजयाची नोंद तर झालीच शिवाय भारताच्या पदकतालिकेतही त्यामुळे भर पडली. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मनूने हे दुसरे कांस्यपदक पटकावले आहे.
सरबज्योत सिंह 2019 पासून खेलो इंडिया स्पर्धांमध्ये भाग घेत असून त्याने आतापर्यंत चार खेलो इंडिया क्रीडास्पर्धांमध्ये भाग घेतला आहे तसेच तो टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीमचा खेळाडू आहे. मनू भाकर देखील खेलो इंडिया मधील माजी खेळाडू असून ती देखील टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीमची खेळाडू आहे.
केंद्र सरकारचे प्रमुख सहाय्य :
सरबज्योत सिंह
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांच्या तयारीच्या काळात सरबज्योत सिंह याला केंद्रसरकारने केलेले प्रमुख सहाय्य :
- प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक सहाय्य : 17 जानेवारी ते 18 फेब्रुवारी 2023 या कालावधीत त्याच्या प्रशिक्षकासह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रशिक्षण आणि सहभागासाठी मदत करण्यात आली.
- वैयक्तिक प्रशिक्षक सहाय्य : 10 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत शैटौरॉक्स येथे वॉल्मेरेंज ओ टी सी आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये उपस्थित राहण्यासाठी त्याचे वैयक्तिक प्रशिक्षक अभिषेक राणा यांच्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले.
प्राप्त झालेले आर्थिक सहाय्य:
- टॉप्स अंतर्गत: 20,24,928 रुपये
- प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी वार्षिक नियोजनाअंतर्गत (ACTC): 1,26,20,970 रुपये
प्रमुख कामगिरी :
- आशियाई स्पर्धा (2022): सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदक.
- आशियाई अजिंक्यपद, कोरिया (2023): 10 मीटर एअर पिस्टल वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक, भारतासाठी ऑलिम्पिक 2024 मध्ये प्रवेशासाठी कोटा स्थान निश्चित केले.
- विश्वचषक, भोपाळ (2023): वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक.
- विश्वचषक, बाकू (2023): मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक.
- कनिष्ठ विश्वचषक, सुहल 2022): सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि वैयक्तिक आणि मिश्र सांघिक स्पर्धेत दोन रौप्य पदके.
- कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, लिमा (2021): सांघिक आणि मिश्र सांघिक स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदके.
मनू भाकर
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांच्या तयारीच्या काळात मनू भाकर हिला केंद्रसरकारने केलेले प्रमुख सहाय्य :
- अॅम्युनेशन आणि हत्यार सर्विसिंग : अॅम्युनेशन आणि हत्यार सर्विसिंग, पेलेट आणि दारूगोळा चाचणी आणि बॅरल निवडीसाठी सहाय्य केले गेले.
- प्रशिक्षण सहाय्य : ऑलिम्पिकच्या तयारीसाठी लक्झेंबर्गमध्ये प्रशिक्षणासाठी वैयक्तिक प्रशिक्षक जसपाल राणा यांच्याकडून प्रशिक्षणासाठी सहाय्य केले.
प्राप्त झालेले आर्थिक सहाय्य:
- टॉप्स अंतर्गत: 28,78,634/- रुपये
- प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी वार्षिक नियोजनाअंतर्गत : 1,35,36,155 /- रुपये
प्रमुख कामगिरी :
- आशियाई स्पर्धा (2022) मध्ये 25 मीटर पिस्टल सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक
- बाकू येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत, (2023) येथे 25 मीटर पिस्टल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक
- चँगवॉन (2023) येथे झालेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत, पॅरिस गेम्स 2024 साठी कोटा स्थान निश्चित
- भोपाळ येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत (2023) 25 मीटर पिस्टल प्रकारात कांस्यपदक
- कैरो येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत (2022) 25 मीटर पिस्टल प्रकारात रौप्य पदक
- चेंगडू येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स, (2021) मध्ये 10 मीटर एअर पिस्टल वैयक्तिक आणि महिला सांघिक स्पर्धेत दोन सुवर्णपदके
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2039279)
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam