अर्थ मंत्रालय
सरकारी योजना आणि धोरणांतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभासाठी पात्र नसलेल्या तरुणांना मदत करण्यासाठी उच्च शिक्षण कर्जासाठी 10 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य.
दर वर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना थेट ई-वाउचर दिले जाणार
मूलभूत संशोधन आणि आदर्श विकासासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन निधी कार्यान्वित केला जाणार.
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2024 12:51PM by PIB Mumbai
केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी योजना आणि धोरणांतर्गत कोणत्याही लाभासाठी पात्र नसलेल्या तरुणांना मदत करण्यासाठी देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी `10 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी आर्थिक मदत जाहीर केली. या उद्देशाच्या पूर्तीसाठी दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना थेट ई-वाउचर दिले जातील. कर्जाच्या रकमेच्या 3 टक्के वार्षिक व्याज सवलतीसाठी हे ई-वाउचर दिले जातील, असे संसदेत आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
मूलभूत संशोधन आणि आदर्श विकासासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन निधी कार्यान्वित केला जाईल, असे ही केंद्रीय वित्त मंत्र्यांनी सांगितले. अंतरिम अर्थसंकल्पातील घोषणेच्या अनुषंगाने व्यावसायिक स्तरावर खाजगी क्षेत्र-चालित संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी `1 लाख कोटी रुपयांच्या वित्तपुरवठ्यासह एक यंत्रणा उभारली जाईल, असेही त्या म्हणाल्या.
***
NM/SMukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2035629)
आगंतुक पटल : 193
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Khasi
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam