पंतप्रधान कार्यालय
डॉ.एमएस वालियाथन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
19 JUL 2024 10:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य सेवा आणि वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील अग्रणी डॉ.एम एस वालियाथन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“आरोग्य सेवा आणि वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील अग्रणी डॉ. एम एस वालियाथन यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या योगदानाने अमिट ठसा उमटवला आहे आणि असंख्य लोकांना त्याचा फायदा झाला आहे. ते विशेषतः किफायतशीर आणि उच्च दर्जाच्या अभिनव संशोधनासाठी स्मरणात राहतील. भारतातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यात ते आघाडीवर होते. त्यांचे कुटुंबीय आणि असंख्य प्रशंसकांच्या दुःखात सहभागी आहे.ओम शांती.”
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2034532)
आगंतुक पटल : 121
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam