आदिवासी विकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी आगामी 100 दिवसांसाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत योजना आणि प्रमुख उपक्रमांच्या प्रगतीचा घेतला आढावा
Posted On:
17 JUL 2024 7:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2024
नवी दिल्ली येथे आज दिवसभर चाललेल्या बैठकीत केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम आणि राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी आगामी 100 दिवसांसाठी मंत्रालयाच्या योजना आणि महत्त्वाच्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
मंत्रालयाच्या योजना आणि उपक्रमांवरील सर्वसमावेशक सादरीकरणाने बैठकीची सुरुवात झाली, त्यानंतर खर्चाचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत पुढील मुख्य योजना आणि उपक्रमांवर चर्चा झाली:
- आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
- प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN)
- प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम योजना (PMAAGY)
- एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS)
- उपजीविका योजना
- घटनेच्या अनुच्छेद 275 (1) च्या तरतुदीनुसार अनुदान
- आदिवासी संशोधन संस्थांना (TRIs) सहाय्य
- स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) सहाय्य
- आरोग्य क्षेत्रात हाती घेतलेले प्रमुख उपक्रम, आणि
- मंत्रालयाच्या विविध विभागांद्वारे हाताळल्या जाणाऱ्या इतर पुरक बाबी
ओराम यांनी सर्वसमावेशक आणि न्याय्य समाजाला चालना देण्यासाठी या उपक्रमांच्या महत्त्वावर भर दिला. या उपक्रमांना चालना देण्यासाठी आवश्यक असलेले सहयोगी प्रयत्न अधोरेखित केले.
आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाच्या निर्धारित उद्दिष्टांसाठी अथक परिश्रम करण्याप्रति मंत्रालयाची एकमताने वचनबद्धता दर्शवत बैठकीचा समारोप झाला.
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2033885)
Visitor Counter : 80