गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज हरियाणा मध्ये महेंद्रगढ येथे 'पिछडा वर्ग सन्मान संमेलनाला' केले संबोधित
इतर मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक मान्यता प्रदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण मागासवर्गीय समाजाला घटनात्मक अधिकार केले बहाल
Posted On:
16 JUL 2024 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2024
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, अमित शहा यांनी आज हरियाणा मध्ये महेंद्रगढ येथे ‘पिछडा वर्ग सन्मान संमेलनाला' संबोधित केले. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, राव इंद्रजित सिंग आणि कृष्ण पाल गुर्जर यावेळी उपस्थित होते.
हे सरकार दलित, गरीब आणि मागासवर्गीयांचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत 2014 मध्ये आपल्या पहिल्या भाषणात सांगितले होते. आपल्या पक्षाने देशाला मागासवर्गीय समाजातून आलेले पहिले अतिशय सक्षम असे पंतप्रधान दिले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळातील 71 मंत्र्यांपैकी 27 मागासवर्गीय असून त्यात 2 हरियाणातील आहेत, असे अमित शाह म्हणाले.
पंतप्रधानांनी प्रथमच केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये, सैनिक शाळा आणि नीट परीक्षांमध्ये 27 टक्के आरक्षण दिले आहे. यासोबतच शेती आणि वेतन यातून मिळणारे उत्पन्न वगळून क्रिमी लेयरची मर्यादा वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णयही पंतप्रधानांनी घेतला, असे शाह यांनी सांगितले.
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2033737)
Visitor Counter : 61