गृह मंत्रालय
केंद्र सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळण्याचा घेतला निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी संघर्ष करणाऱ्या लाखो लोकांचा सन्मान करणे हा आहे - गृहमंत्री
'संविधान हत्या दिवस' प्रत्येक भारतीयामध्ये व्यक्तिस्वातंत्र्य आणि आपल्या लोकशाहीच्या संरक्षणाची अमर ज्योत तेवत ठेवण्यास मदत करेल ,जेणेकरून कोणतीही हुकूमशाही मानसिकता त्या भयावहतेची भविष्यात पुनरावृत्ती करण्यास धजावणार नाही - अमित शाह
25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधानांनी हुकूमशाही मानसिकतेतून देशावर आणीबाणी लादून आपल्या लोकशाहीच्या आत्म्यावर घाला घातला
हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष यातना सहन केलेल्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाची आठवण करून देईल .
प्रविष्टि तिथि:
12 JUL 2024 5:40PM by PIB Mumbai
केंद्र सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी X प्लॅटफॉर्मवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधानांनी हुकूमशाही मानसिकतेचे प्रदर्शन घडवत आणीबाणी लादून आपल्या लोकशाहीच्या आत्म्यावर घाला घातला होता . लाखो लोकांना कोणताही दोष नसताना तुरुंगात डांबण्यात आले आणि माध्यमांचा आवाज दाबण्यात आला. केंद्र सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष यातना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करून देईल.
25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हुकूमशाही मानसिकतेचे प्रदर्शन करत देशावर आणीबाणी लादून आपल्या लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला होता. त्या काळात, स्वतःचा कोणताही दोष नसताना लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले आणि माध्यमांचा आवाज दडपून टाकण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या निर्णयाचा उद्देश, अत्याचारी सरकारच्या हातून अक्षम्य छळ सहन करूनही लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी संघर्ष करणाऱ्या लाखो लोकांच्या आत्म्याचा सन्मान करण्याचा असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. 'संविधान हत्या दिवस' साजरा केल्याने आपल्या लोकशाहीचचे संरक्षण आणि व्यक्तिस्वातंत्र्याची चिरंतन ज्योत प्रत्येक भारतीयांमध्ये तेवत ठेवण्यात मदत होईल, अशा रीतीने कोणत्याही हुकूमशाही शक्तीला या भयावहतेची पुनरावृत्ती होण्यापासून रोखता येईल.
पंतप्रधान @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या निर्णयाचा उद्देश अत्याचारी सरकारच्या हातून अक्षम्य छळ सहन करूनही लोकशाहीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लाखो लोकांच्या आत्म्याचा सन्मान करण्याचा आहे.
***
S.Kakade/S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2032880)
आगंतुक पटल : 168