पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

भारत आणि भूतान यांच्यात वायू गुणवत्ता, हवामान बदल, जंगले, नैसर्गिक संसाधने, नवीकरणीय ऊर्जा स्रोत आणि वन्यजीव संबंधित मुद्द्यांवर द्विपक्षीय बैठक.

Posted On: 12 JUL 2024 11:38AM by PIB Mumbai

भूतान सरकारचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री  जेम शेरिंग यांच्या नेतृत्वाखालील भूतानच्या शाही सरकारच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांची भेट घेतली आणि वायू गुणवत्ता, हवामान बदल, जंगले, नैसर्गिक संसाधने, नवीकरणीय ऊर्जा स्रोत आणि वन्यजीव संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. 

कीर्ती वर्धन सिंह यांनी भारताच्या जागतिक पुढाकार असलेल्या आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडीमध्ये सामील झाल्याबद्दल भूतानच्या मंत्र्यांचे आभार मानले. दोन्ही देशांमध्ये समान भूगोल, परिसंस्था, तसेच लोकशाहीची समान मूल्ये आहेत, असे त्यांनी नमूद केले. हवामान बदल हा दोन्ही देशांसाठी समान चिंतेचा विषय आहे, असे सिंह यांनी सांगितले.

शेरिंग यांनी एप्रिल 2024 मध्ये पारो येथे टायगर लँडस्केप परिषदेसाठी शाश्वत वित्त परिषदेचे यशस्वी आयोजन करण्याबद्दल माहिती दिली. भूतान आधीपासूनच कार्बन निगेटिव्ह देश आहे आणि भूतानसाठी आवश्यक असणाऱ्या विजेचा मोठा वाटा जलविद्युत स्रोतामधून मिळवला जातो, असेही शेरिंग यांनी सांगितले. 

हवामान बदल, वायू गुणवत्ता, जंगले, वन्यजीव व्यवस्थापन आणि पर्यावरण आणि हवामान बदलाच्या क्षेत्रात क्षमता वाढविण्याच्या क्षेत्रात एकत्र काम करण्याचे दोन्ही पक्षांनी मान्य केले. संयुक्त कार्यगटाची बैठक घेण्याची सूचना भारताने केली. 

***

JPS/SMukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2032648) Visitor Counter : 36