शिक्षण मंत्रालय
एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांसंदर्भात दिशाभूल करणाऱ्या बातम्यांबाबत स्पष्टीकरण
इयत्ता 6 वी ची सर्व पाठ्यपुस्तके एनसीईआरटीद्वारे जुलै 2024 मध्ये उपलब्ध करून दिली जाणार
इयत्ता 3 री आणि 6 वी व्यतिरिक्त इतर सर्व वर्गांसाठी, सध्याचा अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकांमध्ये कोणताही बदल नाही
Posted On:
10 JUL 2024 5:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2024
"इयत्ता VI, IX आणि XI च्या सुधारित एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांबाबत गोंधळामुळे शिक्षकांची कोंडी "या 'द हिंदू' वृत्तपत्रात 9 जुलै 2024 रोजी प्रकाशित झालेल्या बातमीच्या संदर्भात स्पष्ट करण्यात येत आहे की या बातमीत तथ्य नाही आणि ती दिशाभूल करणारी आहे.
लेखात नमूद केले आहे की:
इयत्ता VI एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी 2 महिने लागतील
केवळ इयत्ता III आणि VI ला सुधारित पाठ्यपुस्तके मिळतील की इयत्ता IX आणि XI ला देखील समाविष्ट केले जाईल याबाबत सीबीएसई कडून स्पष्टीकरण आलेले नाही.
इयत्ता नववीची इंग्रजी आणि भूगोलाची पाठ्यपुस्तके तसेच इयत्ता अकरावी संगणक विज्ञान, रसायनशास्त्र आणि इतिहासाची पाठ्यपुस्तके छापलेली नाहीत.
कोणतेही गैरसमज दूर करण्यासाठी आणि अधिक स्पष्टतेसाठी, पुढील बाबींचा पुनरुच्चार करण्यात येत आहे -
1. इयत्ता 6 वी ची सर्व पाठ्यपुस्तके एनसीईआरटीद्वारे जुलै 2024 मध्ये उपलब्ध करून दिली जातील. आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे वृत्त चुकीचे आहे. प्रायोगिक शिक्षणाच्या दृष्टीकोनातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी एनसीईआरटीने इयत्ता 6 वी साठी सर्व 10 विषयांमध्ये एक महिना चालणारा सेतू कार्यक्रम उपलब्ध करून दिला आहे जो सध्या शिकवण्यासाठी वापरला जात आहे.
2. मार्च 2024 मध्येच, सीबीएसईच्या Acad. 29/2024 दिनांक 22 मार्च 2024 परिपत्रक क्रमांकाद्वारे माहिती देण्यात आली होती की इयत्ता 3 री आणि 6 वी व्यतिरिक्त इतर सर्व वर्गांसाठी, विद्यमान अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकांमध्ये कोणताही बदल नाही. दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई ने शाळांना पुन्हा एकदा या वर्गांसाठी मागील शैक्षणिक वर्ष (2023-24) प्रमाणेच पाठ्यपुस्तके वापरणे सुरू ठेवण्याची सूचना केली आहे.
3. आरपीडीसी बंगळुरू तामिळनाडूसह सर्व दक्षिण भारतीय राज्यांना सेवा पुरवते. आरपीडीसी बंगळुरूकडून प्राप्त झालेल्या इयत्ता 9 वी आणि 11 वी च्या पाठ्यपुस्तकांची शीर्षक-निहाय मागणी एनसीईआरटी प्रकाशन विभागाने पूर्ण केली आहे आणि आरपीडीसी बंगळुरूत कुठल्याही प्रकारची टंचाई नोंदवली नाही.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2032167)
Visitor Counter : 98