नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

केंद्र सरकारने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत चाचणी सुविधा, पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक पाठबळासाठी अर्थसहाय्य करण्याबाबतच्या योजनेची मार्गदर्शक तत्त्वे केली जारी

Posted On: 04 JUL 2024 4:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जुलै 2024

 

केंद्र सरकारने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत मानके आणि नियामक चौकट विकसित करण्यासाठीच्या चाचणी सुविधा, पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक पाठबळासाठी अर्थसहाय्य करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने 4 जुलै 2024 रोजी योजनेची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

ही योजना हरित हायड्रोजन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हजच्या मूल्य साखळीतील घटक, तंत्रज्ञान आणि प्रक्रियांसाठी सध्या लागू असलेल्या चाचणी सुविधांमधील त्रुटी ओळखायला सहाय्य करेल. ही योजना सुरक्षित परिचालन सुनिश्चित करण्यासाठी नवीन चाचणी सुविधांच्या निर्मितीला आणि सध्याच्या चाचणी सुविधांच्या श्रेणी सुधारणेला पाठबळ देईल.

या योजनेसाठी एकूण 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ती आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत लागू राहील.

राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था योजनेची अंमलबजावणी संस्था असेल.

या योजनेमध्ये GH2 उत्पादन आणि व्यापारामधील गुणवत्ता, शाश्वतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, मजबूत गुणवत्ता आणि कामगिरी  चाचणी सुविधांचा विकास समाविष्ट  आहे.

योजनेची मार्गदर्शक तत्त्वे येथे पाहता येतील

 

* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030746) Visitor Counter : 54