पंतप्रधान कार्यालय
हाथरस दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांना शोक, पीडितांसाठी मदतीची केली घोषणा
Posted On:
02 JUL 2024 8:20PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश मध्ये हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवित हानी बद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी प्रत्येक मृत आणि जखमी व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून (PMNRF) दुर्घटनेतील प्रत्येक मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये, आणि चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
"पंतप्रधान @narendramodi यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून हाथरस येथील दुर्घटनेतील प्रत्येक मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत दिली जाईल."
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2030306)
Visitor Counter : 112
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam