कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह 1 जुलै 2024 रोजी कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी महिनाभर चालणाऱ्या विशेष मोहीमेचा करणार प्रारंभ
1 ते 31 जुलै 2024 या कालावधीत चालणाऱ्या विशेष मोहिमेत 46 मंत्रालये आणि विभाग होणार सहभागी, विशेष मोहिमेअंतर्गत 1891 कौटुंबिक निवृत्तीवेतन तक्रारींचे करण्यात येणार निवारण
प्रविष्टि तिथि:
30 JUN 2024 10:33AM by PIB Mumbai
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, 1 जुलै 2024 रोजी नवी दिल्ली येथे कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी विशेष मोहिमेचा प्रारंभ करतील. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DOPPW), आपल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा एक भाग म्हणून 1 ते 31 जुलै 2024 या कालावधीत कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी, एक महिना चालणारी विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत 46 मंत्रालये आणि विभाग सहभागी होणार आहेत. या विशेष मोहिमेद्वारे कौटुंबिक निवृत्तीवेतनाच्या तक्रारींची प्रलंबित प्रकरणांची संख्या लक्षणीयरीत्या कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे सचिव, माजी सैनिक कल्याण विभाग, सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक, लेखा नियंत्रक, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक तसेच 46 मंत्रालये आणि विभागांचे सार्वजनिक तक्रार नोडल अधिकारी, निवृत्तीवेतन वितरण करणाऱ्या सर्व बँकांचे प्रतिनिधी आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण संघटनेचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
सध्या, केंद्रीकृत पेन्शन तक्रार आणि निवारण प्रणाली (सीपीईएनजीआरएएमएस) वर एका वर्षात सुमारे 90,000 प्रकरणे नोंदवली जात आहेत. अर्जदार थेट पोर्टलवर (URL:www.pgportal.gov.in/PENSION/) तक्रार नोंदवू शकतात किंवा ई-मेल, टपाल किंवा टोल फ्री क्रमांक 1800-11-1960 द्वारे अर्जदाराकडून तक्रारीचा तपशील मिळाल्यावर निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाद्वारे (DOPPW) तक्रारी नोंदवल्या जाऊ शकतात. विभागाकडील एकूण तक्रारींपैकी, कौटुंबिक निवृत्तीवेतन तक्रार प्रकरणे सुमारे 20-25% इतकी आहेत. कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींपैकी बहुसंख्य तक्रारी महिला निवृत्ती वेतनधारकांनी नोंदवलेल्या आहेत. या विशेष मोहिमेत सोडवल्या जाणाऱ्या कौटुंबिक निवृत्तीवेतनाशी संबंधित तक्रारी CPENGRAMS पोर्टलवर नोंदवलेल्या तक्रारींमधून निवडलेल्या आहेत. मोहिमेदरम्यान एकूण 1891 (15.06.2024 पर्यंत) 46 मंत्रालये, विभाग, संस्थांशी संबंधित कौटुंबिक निवृत्तीवेतनाशी संबंधित तक्रारी निवारणासाठी सुचित करण्यात आल्या आहेत. बहुतांश तक्रारी संरक्षण निवृत्ती वेतनधारक, रेल्वे निवृत्तीवेतनधारक आणि गृह मत्रालया अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) निवृत्तीवेतनधारकांशी संबंधित आहेत. बँकेशी संबंधित समस्या देखील मोठ्या प्रमाणात आहेत. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग या तक्रारींचे निरीक्षण करेल आणि मिशन मोडवर तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी संबंधित प्रशासकीय मंत्रालय, विभाग आणि संस्थेला सर्व सहाय्य प्रदान करेल. मंत्रालये आणि विभाग ट्विट तसेच पत्र सुचना कार्यालयच्या निवेदनाद्वारे यशोगाथा प्रसारित करतील. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने ने #SpecialCampaignFamilyPension हा हॅशटॅग तयार केला आहे.
***
NM/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2029646)
आगंतुक पटल : 160