उपराष्ट्रपती कार्यालय

राज्यसभेच्या 264 व्या सत्राच्या प्रारंभी आज राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचे उद्घाटनपर भाषण

Posted On: 27 JUN 2024 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2024

 

सभापती: माननीय सदस्यगण, राज्यसभेच्या 264 व्या सत्राच्या प्रारंभी मी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. आपला मताधिकार वापरत असताना, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील जनतेने आपल्या लोकशाही शासनव्यवस्थेवर आणि आपल्या प्रजासत्ताकातील मूल्यांवर विश्वास व्यक्त केला आहे. या 'लोकशाहीच्या उत्सवाची' यशस्वी सांगता होणे ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे.

नुकत्याच झालेल्या द्विवार्षिक निवडणुकांनंतर या सभागृहाचीही अंशतः पुनर्रचना झाली आहे. सभागृहातील सर्व 61 नवनिर्वाचित/नामनिर्देशित सदस्यांचे अभिनंदन. सदस्य निश्चितपणे त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घेतील आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी योगदान देतील.

लोकशाही अधिक समृद्ध होण्याकरिता आपण सर्वांनी एकजुटीने काम करूया. संवाद, चर्चा, विचारमंथन आणि वादविवाद या सर्वच लोकशाहीचे मूलतत्त्व असलेल्या हितकारक व्यवस्थेत आपण योगदान देऊ या.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2029082) Visitor Counter : 22