पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद
तोकायेव यांच्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानाकडून आभार
धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्याच्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी केला पुनरूच्चार
कझाकस्तानमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एसएसओ) शिखर परिषदेच्या यशासाठी पंतप्रधानांचा संपूर्ण पाठिंबा
प्रविष्टि तिथि:
25 JUN 2024 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांच्यात आज दूरध्वनी संभाषण झाले.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील लोकसभा निवडणुका यशस्वीरीत्या झाल्याबद्दल आणि सलग तिसऱ्यांदा पुन्हा निवडून आल्याबद्दल तोकायेव यांनी मोदी यांचे अभिनंदन केले. तोकायेव यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मोदी यांनी त्यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी एकत्र काम करत राहण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
अस्ताना येथे होणाऱ्या आगामी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एसएसओ) शिखर परिषदेच्या यशासाठी मोदी यांनी संपूर्ण पाठिंबा दिला.
कझाकस्तानचे नेतृत्व प्रादेशिक सहकार्याला चालना देण्यासाठी मोठे योगदान देईल असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याचे मान्य केले.
* * *
S.Patil/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2028644)
आगंतुक पटल : 102
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam