गृह मंत्रालय
लाहौल आणि स्पिती भागात बचाव कार्य राबवल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी भारत-तिबेट सीमा पोलीस दलातील माउंटन रेस्क्यू पथकाचे कौतुक केले
आपल्या धाडसी हिमवीरांचा आम्हाला अभिमान वाटतो – केंद्रीय गृहमंत्री
पॅराग्लायडिंग करताना झालेल्या अपघातात जीव गमावलेल्या अमेरिकी नागरिकाच्या पार्थिवाचे अवशेष मिळवण्यासाठी आयटीबीपीच्या पथकातील जवानांनी मानवतावादी दृष्टीकोनातून स्वतःचा जीव धोक्यात घालत 14,800 फुट उंच डोंगरावर चढाई केली
मानवतेप्रती आयटीबीपीचे समर्पण कौतुकास्पद आहे – अमित शहा
Posted On:
18 JUN 2024 3:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 18 जून 2024
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी लाहौल आणि स्पिती भागात बचाव कार्य राबवणाऱ्या भारत-तिबेट सीमा पोलीस दलातील माउंटन रेस्क्यू पथकाचे कौतुक केले आहे.
एक्स वर पाठवलेल्या संदेशात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की “आपल्या धाडसी हिमवीरांचा आम्हांला अभिमान वाटतो. आयटीबीपीच्या माउंटन रेस्क्यू पथकाने नुकतीच लाहौल आणि स्पिती भागातील उंच डोंगरकड्यांवर आव्हानात्मक शोध मोहीम राबवली आणि पॅराग्लायडिंग करताना झालेल्या अपघातात जीव गमावलेल्या अमेरिकी नागरिकाचे पार्थिव अवशेष शोधून काढले. स्थानिक प्रशासनाच्या विनंतीवरुन आयटीबीपीच्या पथकातील जवानांनी मानवतावादी दृष्टीकोनातून, त्या नागरिकाचे पार्थिव अवशेष मिळवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि 14,800 फुट उंच डोंगरावर चढाई केली. या जवानांचे मानवतेप्रती समर्पण कौतुकास्पद आहे.”
N.Meshram/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2026149)
Visitor Counter : 53