गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा आणि सुविधांच्या व्यवस्थेच्या आढाव्यासाठी उच्चस्तरीय बैठक संपन्न
प्रविष्टि तिथि:
16 JUN 2024 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2024
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा, वाहतूक संबंधी व्यवस्थांचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल , जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आणि लष्कर प्रमुख (नियुक्त ) लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे महासंचालक यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता .

या आढावा बैठकीदरम्यान, केंद्रीय गृह मंत्र्यांनी सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि अमरनाथ यात्रेसाठी पुरेसे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचे निर्देश दिले. त्यांनी प्रभावी सुरक्षा व्यवस्थेसाठी शासनाच्या विविध संस्थांमध्ये समन्वय राखण्याचे, तसेच एक सुस्थापित मानक संचालन प्रतिसाद यंत्रणा निर्माण करायला सांगितले. त्यांनी सांगितले की, “अमरनाथ यात्रेचे भाविक सहजतेने पवित्र दर्शन करू शकतील आणि त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये याला मोदी सरकारचे प्राधान्य आहे ."

जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाने भक्तांसाठी अमरनाथ यात्रा सुरक्षित आणि आरामदायी बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. गेल्या वर्षी 4.5 लाखांहून अधिक भक्तांनी पवित्र दर्शन घेतले. यावर्षी ही यात्रा 29 जून रोजी सुरू होईल. जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने यात्रेच्या सुरळीत आयोजनासाठी व्यापक व्यवस्था केल्या आहेत.ज्यात विना अडथळा नोंदणी सेवा, शिबिरांच्या सुविधा, वैद्यकीय सुविधा, विविध मार्गांबद्दल अद्ययावत माहिती देणे, वीज आणि पाणीपुरवठा आणि मोबाईल फोन कनेक्टिव्हिटी यांचा समावेश आहे.
S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2025806)
आगंतुक पटल : 147