दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी दूरसंचार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला

प्रविष्टि तिथि: 11 JUN 2024 6:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जून 2024

 

ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी आज दूरसंचार मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.

प्रसारमाध्यमांना संबोधित करताना त्यांनी आजच्या युगात भारताला आसेतुहिमाचल जोडून ठेवण्यात दूरसंचार विभाग आणि भारतीय टपाल विभागाच्या महत्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी भर दिला. गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने या क्षेत्राचा कायापालट केला आहे असे सांगून  पुढील काळात भारताला एक  शाश्वत, ग्राहककेंद्री आणि स्पर्धात्मक अशी दूरसंचार आणि टपाल बाजारपेठ म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आपण आपल्या दृढ निश्चयाचा पुनरुच्चार करतो, असे ते म्हणाले.

 

S.Kane/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2024311) आगंतुक पटल : 128
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Punjabi , Gujarati , Telugu , Kannada , Malayalam