नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
प्रल्हाद जोशी यांनी स्वीकारला नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार
Posted On:
11 JUN 2024 4:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
अटल अक्षय ऊर्जा भवन येथे आज प्रल्हाद जोशी यांनी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रीपदाव्यतिरिक्त केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. श्रीपाद येसो नाईक यांनी आज नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयात राज्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अक्षय ऊर्जा क्षेत्राच्या महत्त्वावर जोशी यांनी भर दिला आणि या क्षेत्राच्या वाढीसाठी अफाट क्षमता असल्याचे सांगितलं. देशातील वाढती ऊर्जेची मागणी आणि पर्यावरणीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जा उपक्रमांना पुढे नेण्यासाठी सरकारची वचनबद्धताही त्यांनी विशद केली.

त्या नंतर उर्जा मंत्र्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जोशी यांना बैठकीत माहिती दिली.

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2024146)
अभ्यागत कक्ष : 111
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam