पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळासाठी पंतप्रधान म्हणून घेतली शपथ

Posted On: 09 JUN 2024 11:55PM by PIB Mumbai

श्री नरेंद्र मोदी यांनी  राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांना शपथ दिली. 

पंतप्रधानांनी आपल्या X पोस्टवर लिहिले आहे: 

“संध्याकाळी समारंभपूर्वक पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.आता 140 कोटी भारतीयांची सेवा करण्यास आणि भारताला प्रगतीच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी आमच्या मंत्रिमंडळासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.

ज्यांनी  शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन करतो.  मंत्र्यांच्या या समूहात तरुणाई आणि ज्येष्ठांचा अनुभव यांचे उत्तम मिश्रण आहे आणि आम्ही लोकांचे जीवनमान सुधारण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.

शपथविधी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व परदेशी मान्यवरांबद्दल  मी आभार व्यक्त करतो. मानवी प्रगतीचा आलेख उंचाविण्यासाठी भारत आपल्या या मौल्यवान भागीदारांसोबत नेहमीच काम करेल." 

"राष्ट्रपति भवनाच्या प्रांगणात संध्याकाळी झालेल्या समारंभात मी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.मी आणि मंत्रीमंडळातील माझे सहकारी 140 कोटी देशवासियांची सेवा करण्यासाठी आणि देशाला विकासाच्या नव्या वाटेवर नेण्यासाठी आम्ही सर्व वचनबद्ध आहोत 

सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या माझ्या सर्व सहका-यांचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. मंत्र्यांच्या या समूहात तरुणाई आणि ज्येष्ठांचा अनुभव यांचे उत्तम मिश्रण आहे सर्व देशवासीयांचे जीवनमान अधिक उत्तम बनविण्यासाठी आम्ही आमच्या प्रयत्नांत कोणतीही कसर ठेवणार नाही.

आमच्या शपथ ग्रहण समारंभात सहभागी होण्यासाठी सामील होण्यासाठी आलेल्या विश्वभरातील सन्माननीय निमंत्रित पाहुण्यांचा अंतःकरणापासून आभार मानतो. विश्व बंधु यास्वरूपात भारत सदैव आपल्या शेजारील सहकारी देशांसोबत मानवतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहू."

 ***

NM/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2023697) Visitor Counter : 137