पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
जागतिक पर्यावरण दिनी पंतप्रधानांनी दिल्लीत बुद्ध जयंती पार्कमध्ये लावले पिंपळाचे रोपटे आणि सुरू केली #एक_पेड़_माँ_के_नाम #Plant4Mother campaign ही मोहीम
धरतीमातेकडून निसर्गाची केली जाणारी जोपासना आणि आपल्या मातांकडून मानवी जीवांचे होणारे संगोपन यामधील साम्य दर्शवत पंतप्रधानांनी जनतेला आपल्या स्वतःच्या आईविषयी प्रेम, आदर आणि सन्मान प्रदर्शित करण्यासाठी वृक्षारोपण करण्याचे केले आवाहन
केंद्रीय आणि राज्य सरकारी विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था देखील या मोहिमेला पाठबळ देण्यासाठी उपलब्ध करून देणार सार्वजनिक जागा
या मोहिमेशिवाय “एक संपूर्ण सरकार आणि संपूर्ण समाज” या दृष्टीकोनाचा अवलंब करत सप्टेंबर 2024 पर्यंत 80 कोटी वृक्ष आणि मार्च 2025 पर्यंत 140 कोटी वृक्ष लागवड करण्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे
Posted On:
05 JUN 2024 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2024
जागतिक पर्यावरण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत बुद्ध जयंती पार्कमध्ये पिंपळाचे रोपटे लावले आणि #एक_पेड़_माँ_के_नाम #Plant4Mother campaign ही मोहीम सुरू केली.
धरतीमातेकडून निसर्गाची केली जाणारी जोपासना आणि आपल्या मातांकडून मानवी जीवांचे होणारे संगोपन यामधील साम्य दर्शवत पंतप्रधानांनी जनतेला आपल्या स्वतःच्या आईविषयी प्रेम, आदर आणि सन्मान प्रदर्शित करण्यासाठी एक झाड लावण्याचे आणि झाडांचे आणि धरती मातेचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा करण्याचे देखील आवाहन केले.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, दिल्लीचे नायब राज्यपाल हेही यावेळी उपस्थित होते.
#एक_पेड़_माँ_के_नाम #Plant4Mother campaign या मोहिमेला पाठबळ देण्यासाठी केंद्रीय आणि राज्य सरकारी विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थादेखील सार्वजनिक जागा उपलब्ध करून देणार आहेत.
वृक्षारोपण ही जागतिक पर्यावरण दिन 2024 ची मध्यवर्ती संकल्पना असून भूमी अवनतीची प्रक्रिया रोखणे, दुष्काळाला तोंड देण्याची क्षमता निर्माण करणे आणि वाळंवटीकरणाला प्रतिबंध करणे हा तिचा उद्देश आहे.
संपूर्ण सरकार आणि संपूर्ण समाज दृष्टिकोनाचे अनुसरण करत #एक_पेड़_माँ_के_नाम #Plant4Mother या मोहिमेबरोबरच सप्टेंबरपर्यंत 80 कोटी तर मार्च 2025 पर्यंत 140 कोटी वृक्षलागवडीचे नियोजन आहे. देशभरात व्यक्ती, संस्था, समुदाय आधारित संस्था, केंद्र आणि राज्य सरकारचे विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून वृक्ष लागवड केली जाईल.
केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने साडेसात लाख शाळांमधील इको क्लबना #एक_पेड़_माँ_के_नाम या संदेशाचा प्रसार करण्यासाठी चालना दिली आहे. या संकल्पनेवर शाळांमधील उन्हाळी शिबिरांमध्ये भर दिला जात आहे. अनुभवातून शिक्षण हा नव्या शैक्षणिक धोरणाचा गाभा असून त्यानुसार उन्हाळी शिबिरांमध्ये संकल्पना राबवली जात आहे.
वृक्षलागवडीमुळे मानवाचे आणि पृथ्वीवरच्या सर्व सजीवांचे होणारे पालनपोषण, वृक्ष, माता आणि भूमाता यांचे आपापसातले संबंध या सगळ्याच्या महत्त्वावर या संकल्पनेचा भर आहे.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची, पर्यावरणीय सर्व माहिती, जागरूकता, क्षमता बांधणी आणि उपजीविका कार्यक्रम (इआयएसीपी) केंद्रे त्याचबरोबर बीएसआय, झेडएसआय, आयसीएफआरई, एनएमएनएच अशा निगडित संस्था वृक्ष लागवडीविषयी जनजागृती करण्यात सक्रिय आहेत. त्याचबरोबर #एक_पेड़_माँ_के_नाम या संकल्पनेअंतर्गत वृक्षलागवड करत आहेत.
इतर मंत्रालये आणि विभागही या संकल्पनेला चालना देण्यात लक्षणीय भूमिका बजावत आहेत. युवा कल्याण मंत्रालयाच्या माय भारतच्या उपक्रमातून युवकांमध्ये याविषयी जागरुकता आणली जात आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही जागतिक पातळीवर हा संदेश पोहोचवला असून इतर देशातील नागरिकांनाही या मोठ्या वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले आहे.
* * *
S.Kakade/Shailesh/Prajna/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2022870)
Visitor Counter : 114