आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
निम्हंसला जागतिक आरोग्य संघटनेकडून 2024 साठी नेल्सन मंडेला आरोग्य प्रचार पुरस्कार
हा पुरस्कार म्हणजे मानसिक आरोग्य आणि कल्याणाच्या प्रचारासाठी निम्हंसच्या समर्पण आणि उत्कृष्ट योगदानाची साक्ष
Posted On:
31 MAY 2024 4:22PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत असलेल्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जाविज्ञान संस्था ( निम्हंस )या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेला जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्लूएचओ) 2024 साठीचा नेल्सन मंडेला आरोग्य प्रचार पुरस्कार मिळाला आहे.
नेल्सन मंडेला आरोग्य प्रचार पुरस्कार, 2019 मध्ये डब्लूएचओ द्वारे स्थापित केला गेला, व्यक्ती, संस्था आणि/किंवा सरकारी किंवा बिगर-सरकारी संस्थांच्या आरोग्य प्रचारामध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो.
केंद्रीय आरोग्यमंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी निम्हंसचे या पुरस्कारासाठी अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की हा पुरस्कार म्हणजे "समावेशक आरोग्यसेवेमधील भारताच्या प्रयत्नांना मिळालेली पावती आहे."
केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्र यांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील भारताच्या प्रयत्नांची आणि पुढाकार घेऊन केलेल्या कार्याची मान्यता मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि निम्हंसचे या यशाबद्दल अभिनंदन केले.
“आमच्या संस्थात्मक प्रवासाच्या या टप्प्यावर प्रतिष्ठित नेल्सन मंडेला आरोग्य प्रचार पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो,” असे निम्हंसच्या संचालक डॉ. प्रतिमा मूर्ती म्हणाल्या.
हा पुरस्कार निम्हंसच्या मानसिक आरोग्य आणि कल्याणाच्या प्रचारासाठी केलेल्या समर्पण आणि उत्कृष्ट योगदानाचा साक्षीदार आहे. निम्हंस मानसिक आरोग्य आणि तंत्रज्ञानाच्या आघाडीवर आहे, संशोधन, शिक्षण, आणि रुग्णसेवेसाठी अभिनव दृष्टिकोनांचा प्रचार निम्हंस करत आहे.
अलीकडच्या काळात भारताने मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आज राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून देशातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये मानसिक आरोग्य युनिट्सना पाठिंबा दिला जातो. 10 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू करण्यात आलेल्या भारताच्या राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य हेल्पलाइन, टेली मानसने नुकताच 10 लाख कॉल्स हाताळण्याचा मैलाचा दगड गाठला आहे.
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2022374)
Visitor Counter : 134