आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

77 व्या जागतिक आरोग्य संमेलनाच्या पूर्ण सत्राला केंद्रीय आरोग्य सचिवांनी केले संबोधित

Posted On: 29 MAY 2024 3:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मे 2024

 

जिनिव्हा येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या 77 व्या संमेलनाच्या पूर्ण सत्रात भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज  संबोधित केले.

वसुधैव कुटुंबकम् म्हणजेच “जग हे एक कुटुंब आहे” या प्राचीन भारतीय परंपरेला सुसंगत “सर्वांसाठी आरोग्य” ही या वर्षीची संकल्पना आहे असे केंद्रीय आरोग्य सचिवांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.  

“भारताने 1,60,000 हून अधिक आरोग्य आणि निरामयता केंद्रे (आयुष्मान आरोग्य मंदिर) कार्यान्वित करून सार्वत्रिक आरोग्याच्या  प्रसाराला प्रोत्साहन देण्यासाठी “आयुष्मान भारत” या संकल्पने द्वारे एक मोहीम कार्यान्वित केली”असे त्यांनी यावेळी सांगितले.

WHO SPAR अहवालानुसार, दक्षिणपूर्व आशिया क्षेत्र आणि जागतिक सरासरीपेक्षा जास्त असलेल्या कोणत्याही आरोग्य संबंधी आपत्कालीन आव्हानाचा शोध , , मूल्यांकन , नोंद करण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी 86% इतकी क्षमता भारताकडे आहे, असे अपूर्व चंद्रा यांनी अधोरेखित केले.“गेल्या दशकांमध्ये माता मृत्यू दर  (MMR) आणि बालमृत्यू दर (IMR) मध्ये लक्षणीय घट दर्शवत, भारत शाश्वत विकास उद्दिष्ट  गाठण्याच्या मार्गावर आहे.”असे त्यांनी सांगितले.

343 दशलक्ष पेक्षा जास्त लाभार्थींची  दुय्यम आणि तृतीय स्तरावर काळजी घेणे ,रुग्णालय भरती यासाठी प्रतिवर्ष प्रति कुटुंब 6000 डॉलर्सचे आरोग्य कवच प्रदान करणारी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे;ज्यात  खिशातील पैसे खर्च होत नाहीत,असे सांगत त्यांनी योजनेच्या  महत्वावर भर दिला.

आरोग्यसेवेतील डिजिटल उपक्रमांची माहिती देताना ते म्हणाले की "भारत जागतिक सहकार्यासाठी डिजिटल सार्वजनिक उपक्रमांतून एक  दीपस्तंभ देश म्हणून उदयास आला आहे".

"वैद्यकीय प्रतिबंधक उपायांत सर्वसमावेशकता असावी आणि तो  सर्वांसाठी मूलभूत अधिकार असावा यावर केंद्रीय आरोग्य सचिवांनी भर  दिला.यात  लस पुरवठ्यासाठी जागतिक उत्पादनातील  भारताच्या 60% योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत  ते म्हणाले, "सर्वांसाठी उच्च दर्जाच्या वैद्यकीय उत्पादनांची सहज उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने औषध नियामक व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा भारताचा मानस आहे".

केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व सदस्य देशांना शाश्वत विकासाचा आधारस्तंभ म्हणून आरोग्य आणि स्वास्थ  संवर्धनासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्यासाठी वचनबद्ध रहाण्याचे आवाहन करून आपल्या भाषणाचा समारोप केला.

"एकत्रितपणे, आपण पुढे जाऊ या आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य घडवूया", असे ते म्हणाले.

 

* * *

S.Kane/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022060) Visitor Counter : 70