नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 ला नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा सचिवांनी केले संबोधित, नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन क्षेत्राबाबत भारताच्या दृष्टीकोन आणि क्षमतांविषयी दिली माहिती

Posted On: 16 MAY 2024 5:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2024

नेदरलँड्समधील रॉटरडॅम येथे आयोजित जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 ला केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव, भूपिंदर सिंग भल्ला यांनी 15 मे 2024 रोजी संबोधित केले. भल्ला यांनी यावेळी  नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन उत्पादन क्षेत्रात भारताचा धोरणात्मक दृष्टीकोन  आणि क्षमता याविषयी माहिती दिली.

पथदर्शी प्रकल्प, संशोधन आणि विकास उपक्रम आणि कौशल्य विकास कार्यक्रम यासारख्या घटकांचा समावेश असलेले  राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाचे सर्वसमावेशक स्वरूप,भल्ला यांनी अधोरेखित केले."हायड्रोजन मूल्य शृंखलेत नवोन्मेष, सहयोग आणि क्षमता बांधणी याला चालना देण्यासाठीची सरकारची वचनबद्धता या सर्वांगीण दृष्टिकोनातून प्रतिबिंबित होते. याखेरीज पथदर्शी प्रकल्प आणि संशोधन व विकास पुढे नेण्याचे अभियानाचे लक्ष्य, अत्याधुनिक उपाय आणि सर्वोत्तम पद्धतींचा उदय होण्यास प्रोत्साहन देत, हरित हायड्रोजन तंत्रज्ञानासाठी उत्तम परिसंस्थेच्या पोषणासाठी भारताची वचनबद्धता अधोरेखित करते."

देशाच्या नवीकरणीय ऊर्जेच्या कमी खर्चावर भर देऊन, परवडणाऱ्या नवीकरणीय ऊर्जेत जागतिक अग्रणी म्हणून भारताच्या भूमिकेचा नवीन  आणि नवीकरणीय ऊर्जा सचिवांनी पुनरुच्चार केला."शाश्वत ऊर्जा स्त्रोतांकडे संक्रमण करण्याच्या वचनबद्धतेसह, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी आकर्षक संधी भारताट स्पर्धात्मक मूल्यासह उपलब्ध आहेत."भल्ला यांनी राष्ट्रीय ऊर्जा मिश्रणात अक्षय ऊर्जा स्त्रोतांचे विना अडथळा एकात्मीकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या  भारताच्या एकात्मिक ग्रीड पायाभूत सुविधेविषयी  माहिती दिली.

हरित हायड्रोजनचा अग्रणी निर्यातदार म्हणून उदयाला येण्याची भारताची महत्वाकांक्षा भल्ला यांनी अधोरेखित केली. शाश्वत ऊर्जा पद्धतींबाबत भारताचा स्पष्ट दृष्टीकोन  आणि वचनबद्धता नमूद  करून त्यांनी जागतिक हायड्रोजन अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावण्याचा देशाचा निर्धार अधोरेखित केला."उत्पादन वाढवण्यावर धोरणात्मक लक्ष केंद्रित करून, हरित हायड्रोजनसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उदयोन्मुख संधींचा फायदा करून घेण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. याद्वारे जागतिक ऊर्जा संक्रमणात महत्त्वपूर्ण देश म्हणून आपले स्थान अधिक बळकट होईल."

जर पुरेशी बाजारपेठ मागणी आणि समर्थन असेल तर हरित हायड्रोजनच्या उत्पादनाची कितीही  मागणी पूर्ण करण्याची भारताची क्षमता असल्याची ग्वाही केंद्रीय सचिवांनी  जागतिक हायड्रोजन शिखर परिषदेच्या प्रतिनिधींना दिली.

S.Kane/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


 



(Release ID: 2020803) Visitor Counter : 75